नीतीश कुमार यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये राज्यसभासाठी नामांकन अर्ज दाखल केला (फोटो - एक्स)
बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपच्या युतीला घवघवीत यश मिळाले होते. यानंतर नीतीश कुमार यांनी नवा विक्रम करत 10 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर लगेचच त्यांनी दिल्लीमध्ये जाण्याचे स्वप्नपूर्ती करत राज्यसभेचे खासदार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यसभेसाठी नामांकर अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगली आहे.
राज्य सभा के लिए अपना नामांकन पत्र दाखिल किया। pic.twitter.com/R9mDOHUfYr — Nitish Kumar (@NitishKumar) March 5, 2026
हे देखील वाचा : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार काय म्हणाले?
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावरचा विश्वास आणि पाठिंबा कायम ठेवला आहे आणि त्यामुळेच मी बिहार आणि तुम्हा सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्याच्या बळावरच आज बिहार विकास आणि आदराचे एक नवीन आयाम सादर करत आहे. मी यापूर्वी अनेक वेळा तुमचे आभार मानले आहेत.”
हे देखील वाचा : नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार? बिहारच्या राजकारणात काय आहे गेम चेंजर प्लॅन!
माझी एक इच्छा होती
ते पुढे म्हणाले, “माझ्या संसदीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मला बिहार विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती. या संदर्भात, मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे.”
मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे खात्री देऊ इच्छितो की तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याचा माझा संकल्प अढळ राहील. स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझे पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल.” असे नीतीश कुमार म्हणाले आहेत.






