Chandrashekhar Bawankule told AI-based MOU alarm sound as soon as the leopard enters the village.
नागपूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील अनेक भागांमध्ये नागरी वस्त्यांमध्ये जंगली जनावरे शिरत आहेत. अन्न पाण्याच्या शोधामध्ये आलेली ही जंगली जनावरे शेतकऱ्यांचे पाळवी प्राणी घेऊन जात आहेत. यामुळे अनेकांना मोठे नुकसान होत असून यामध्ये प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण होते. लवकरच ताडोबापासून ते नवेगाव बांध पर्यंत सर्वच फॉरेस्ट एरियात कॅमेरे लागणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
जंगली प्राण्यांपासून सावध राहण्यासाठी एआय बेस्ड एमओयू लावण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, “अतिशय महत्त्वाचे जे जगातील आधुनिक तंत्रज्ञान यातून हे जे टेक्नॉलॉजी घेतोय, 900 ठिकाणी कॅमेरे असणार आहेत, 900 ठिकाणी अलार्म असतील, ताडोबापासून ते नवेगाव बांध पर्यंत सर्वच फॉरेस्ट एरिया आहेत त्यात करता एम ओ यु झाले. जेव्हा एखादा वाघ किंवा बिबटे गावाकडे येतो आहे आणि खाजगी शेतीकडे येतो आहे, हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावाला अलार्म देतील. त्यामुळे अचानक झडप घेऊन जीव घेतला अशा घटना घटल्या, गेल्या तीन वर्षात वाघांचं प्रमाण वाढलाय आणि त्यामुळे गावाकडे वाघ येऊ लागले आहेत त्यामुळे ही टेक्नॉलॉजी लोकांचा जीव वाचवण्याकरिता आहे,” अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “हे तंत्रज्ञान जंगलात वापरले गेले तर मोठ्या प्रमाणात जीवहानी आणि थांबेल. वनमंत्री मी एक योजना दिली वनाला लागून असलेली शेतकऱ्याची जमीन जे वन्य प्राण्यांमुळे घाबरलेले आहेत, जी शेतकऱ्यांची जमीन पडीत आहे, अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी वर्षाचे त्यांना आम्ही तीस वर्षाकरिता भाडे देणार. या जमिनीवर वनविभाग सोलार प्रकल्प, बांबू लागवडीचे प्रकल्प, ग्रासलँड डेव्हलप करतील, त्यामुळे पुढच्या काळात ही योजना त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या धर्तीवर वनात शेतकरी काम करतात त्यांना ५० हजार रुपये एकरी वर्षाचे महाराष्ट्र सरकार एम ओ यु करणार आहे, त्यामुळे पडीत जमिनीचा प्रश्न निकाली निघेल. मारवल कंपनीने जे तंत्रज्ञान आणले आहे ती अत्यंत महत्त्वाचे आहे, विदर्भासाठी वरदान ठरणार आहे,” अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागपूरमध्ये जोरदार पाऊस देखील झाला. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व प्रशासनाला आदेश दिले आहेत आमचे नागपूरचे जवळपास पंचनामे झाले. विदर्भातील पंचनामे लवकर होतील. पंचनामे करू आणि नुकसान भरपाई देऊ, अशी भूमिका बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच वृक्ष लागवड जे टारगेट आहे ते आम्ही दीड कोटी स्वीकारलेले आहे, औष्णिक वीज केंद्र जास्त प्रदूषण होतात त्यांनी जास्त टार्गेट घ्यावं आणि जे राज्य आणि केंद्र सरकारचे विभाग आहे ते या बैठकीला होते 30 ऑगस्टपर्यंत नागपूरला दीड कोटी झाडे लावण्याचा टार्गेट आम्ही करतोय,” अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.