Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी,” छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ यांनी याविषयावर मोठे भाष्य करत "राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे," असे वक्तव्य केले आहे.

  • By विवेक
Updated On: May 22, 2026 | 02:30 PM
Chhagan Bhujbal says, "there is enough storage of petrol diesel", Chagan Bhujbal on Petrol Diesel shortage, Petrol Diesel prize hike,

Chhagan Bhujbal says, "there is enough storage of petrol diesel", Chagan Bhujbal on Petrol Diesel shortage, Petrol Diesel prize hike,

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका – इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जगभरात इंधनाच्या साठ्यामध्ये आणि दरांमध्ये मोठी चढ-उतार
  • महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध – छगन भुजबळ
  • नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे – छगन भुजबळ
अमेरिका – इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जगभरात इंधनाच्या साठ्यामध्ये आणि दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशातही इंधनटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आवाहन करत पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केले होते. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दरसुद्धा सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याविषयावर मोठे भाष्य करत “राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे,” असे वक्तव्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?

माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, “राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

“देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

विधान परिषदेतील जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी; भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी…

मंत्र्यांनी सुरु केला EV वाहनांचा वापर

पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीविषयी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात मोठी घाट केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातसुद्धा याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच आपल्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधत आपल्या वाहनांचा ताफा कमी करत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय ते इलेक्ट्रिक वाहनांमधूनच प्रवास करताना दिसून आले. मंत्री नितेश राणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर हेदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

“पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार,” राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ

Web Title: Chhagan bhaujbal says there is enough storage of petrol diesel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Diesel Petrol Price

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
1

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

जातनिहाय जनगणनेवरून छगन भुजबळ – हरिभाऊ राठोड आमनेसामने; 2011 च्या जनगणनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली
2

जातनिहाय जनगणनेवरून छगन भुजबळ – हरिभाऊ राठोड आमनेसामने; 2011 च्या जनगणनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.