Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनाशकारी… E20 पेट्रोलमुळे वाहन मालक संतप्त, गाडीचे मायलेजही घटत असल्याचं सर्वेक्षणांतून आलं समोर

भारतात पेट्रोलमध्ये २०% इथेनॉलचे मिश्रण असलेल्या E20 पेट्रोलच्या वापराबाबत वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार, अनेक वाहनधारकांनी या इंधनाला 'विनाशकारी' म्हटले असून, यामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये मोठी घट झाल्याचा आणि इंजिन खराब होत असल्याचा दावा केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 06, 2026 | 05:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विनाशकारी…
  • E20 पेट्रोलमुळे वाहन मालक संतप
  • गाडीचे मायलेजही घटतंय
देशभरात E20 पेट्रोल लागू होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सरकारचा दावा आहे की यामुळे कच्च्या तेलावरील भारतीयांचं अवलंबित्व कमी होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा परिणाम प्रदूषक कमी होण्यास होईल असं सांगण्यात आलं होतं. पण नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक वाहन मालकांचा अनुभव काही वेगळात आहे. काय आहे नेमके आकडे? तुमच्या वाहनांवर असा परिणाम होतो का?

Weekend Spending Report: वीकेंड मोड Full On! इतका पैसा खर्च करतात तरी कुठे? ‘या’ रिपोर्टने भारतीयांची केली पोलखोल

लोकलसर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, पेट्रोल वाहन मालक ई२० पेट्रोलमुळे नाराज आहेत. त्यांच्या मते, यामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि देखभालीचा खर्च वाढला आहे.

लोकांनी या अनुभवाला ‘विनाशकारी’ म्हटलं

या सर्वेक्षणात २२,५६७ पेट्रोल वाहनांच्या मालकांनी भाग घेतला. यापैकी ५३% लोकांनी रस्ते वाहतूक आणि पेट्रोलियम मंत्रालयाने केलेल्या ई२० पेट्रोलच्या अंमलबजावणीला ‘विनाशकारी’ किंवा ‘अकार्यक्षम’ म्हटले. ४२% लोकांनी याला सरळसरळ ‘विनाशकारी’ म्हटले, तर ११% लोकांनी याला ‘अत्यंत अकार्यक्षम’ किंवा ‘बऱ्यापैकी अकार्यक्षम’ म्हटले. केवळ १३% लोकांनी सरकारच्या कामगिरीला चांगली किंवा प्रभावी म्हटले, तर १९% लोकांनी ती सरासरी असल्याचे म्हटले. सर्वेक्षणातून असे दिसून येते की, सकारात्मक प्रतिसादांच्या संख्येपेक्षा असमाधानाची संख्या जवळपास चार पटीने जास्त आहे.

मायलेजच्या तक्रारी

सर्वेक्षणातील सर्वात मोठी तक्रार इंधन कार्यक्षमतेबद्दल होती. २०२३ पूर्वीच्या ६६% पेट्रोल वाहन मालकांनी सांगितले की, E20 पेट्रोल वापरण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या वाहनाचे मायलेज १०% पेक्षा जास्त कमी झाले आहे. जवळपास ४५% लोकांनी सांगितले की, त्यांच्या वाहनांना पूर्वीपेक्षा जास्त दुरुस्ती आणि देखभालीची आवश्यकता आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, इंधनाची बचत होण्याऐवजी, आता त्यांना जास्त खर्च येत आहे.

जुन्या पेट्रोलची मागणी

सर्वेक्षणातील एक मनोरंजक निष्कर्ष असा आहे की, ३१% वाहन मालकांना थोडे जास्त पैसे मोजावे लागले तरीही, E0 किंवा E10 पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय हवा आहे. लोकांचे म्हणणे आहे की, २०२३ पूर्वी खरेदी केलेली अनेक वाहने E20 पेट्रोल लक्षात घेऊन तयार केलेली नव्हती. त्यामुळे, या नवीन इंधनाचा त्यांच्या वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.

सरकारचं काय स्पष्टीकरण?

केंद्र सरकारचा दावा आहे की ई२० पेट्रोलमुळे मायलेजवर लक्षणीय परिणाम होत नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यापूर्वी म्हटले आहे की, ई२० बाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. सरकार असेही सांगते की, इथेनॉल मिश्रणामुळे देशाची तेल आयात कमी होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पर्यावरणाला फायदा होईल. इतकेच नाही, तर १ एप्रिल २०२६ पासून देशभरात विकल्या जाणाऱ्या ई२० पेट्रोलसाठी नवीन RON 95 मानक लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारेल.

वाहन मालकांचं म्हणणं काय?

सरकारी आकडेवारीनुसार, इथेनॉल मिश्रणामुळे २०२५ मध्ये शेतकऱ्यांसाठी अंदाजे ₹४०,००० कोटींचे उत्पन्न निर्माण झाले आहे आणि भारताने परकीय चलनात अंदाजे ₹४३,००० कोटींची बचत केली आहे. पण सर्वेक्षण केलेल्या अनेक वाहन मालकांचे म्हणणे आहे की, हे फायदे जुन्या वाहन मालकांना दिले जाऊ नयेत. त्यांच्या मते, जर ई२० मुळे जुन्या वाहनांमध्ये बदल आणि दुरुस्तीची आवश्यकता भासली, तर सरकारने त्यातही मदत केली पाहिजे.

Small Business Idea: ना लाखोंचं भांडवल, ना ऑफिसची गरज; घराच्या एका कोपऱ्यातून सुरु करुन बंपर कमवताहेत लोकं

Web Title: E20 petrol owners survey mileage drop engine damage news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • automobile news
  • Bike Engine care
  • Diesel Petrol Price
  • E20 Fuel

संबंधित बातम्या

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?
1

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.