Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026 : तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये अन्.. ; गावची शाळा पाहून अभिजीत दिपकेंची नाराजी

“नवीन पीएम हाऊस आणि संसद भवन बांधण्यापेक्षा आधी शाळा बांधा. अशा इमारतींमुळे देशाची प्रगती होत नाही. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतात आणि त्यांच्या मुलांचे भविष्य सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी नमूद केले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 15, 2026 | 12:56 PM
  • सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या ‘बटेंगे तो कटेंगे’सारख्या राजकारणापासून दूर राहून विकासाच्या मुद्यांवर बोलण्याचे आवाहन CJP ने केले आहे.
  • शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी किंवा राजकीय स्वार्थ नसून एक चांगला आणि सुसंस्कृत नागरिक घडवणे हा असावा.
  • महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील सरकारी शाळांची बिकट अवस्था सुधारण्यासाठी सीजेपीचे हे अभियान एक प्रभावी दबावगट ठरत आहे.
Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आजपासून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची सुरुवात केली. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपल्या मूळ गावी हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करून या अभियानाला सुरुवात केली.

ध्वजारोहणानंतर दीपके यांनी गावातील शाळेला भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान वर्गांच्या फुटलेल्या खिडक्या आणि अस्वच्छ शौचालये आणि त्यांची दुरावस्था दिसून आली. फुटलेल्या खिडक्या झाकण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोंचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसल्याने अभिजीत दिपकेंनी अवस्थेबाबत दीपके यांनी नाराजी व्यक्त केली.

CJPच्या ‘School Thik Karo’ मोहीमेला आजपासून सुरुवात; ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणार मोठा बदल

‘ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्याशिवाय विकास शक्य नाही’ अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, “खिडक्या फुटक्या आहेत, बाथरूम घाण आहे. ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्या नाहीत, तर देशाचा विकास होणे शक्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर शाळेतील या समस्या दूर कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. अभिजीत दिपके यांच्या या प्रतिक्रीयेनंतर पुढी आठ दिवसांत शाळेतील दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही सरपंचांनी दिल्याचे दीपके यांना दिली.

‘शाळा बंद पडण्यास सरकारचे धोरण जबाबदार’

अभिजीत दिपके म्हणाले, राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था खराब असून, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा कमी होत आहे. त्यात भर म्हणून आता सरकारने शिक्षकांना एसआयआरच्या कामाला लावले आहे. सरकारने शिक्षकांना एसआयआरच्या कामाला लावण्याऐवजी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि शिक्षकांना केवळ शिकवण्याचे काम द्यावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

सरकारी शाळा बंद पडण्यामागे सरकारचे धोरणही कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच आज सरकारी शाळा बंद पडत असल्याचे त्यांनी नमुद केले. देशातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपके यांनी सरकारवर टीका केली.

Independence Day Medals 2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राचा बहुमान! ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

“नवीन पीएम हाऊस आणि संसद भवन बांधण्यापेक्षा आधी शाळा बांधा. अशा इमारतींमुळे देशाची प्रगती होत नाही. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतात आणि त्यांच्या मुलांचे भविष्य सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘बटेंगे तो कटेंगे’च्या राजकारणात पडू नका

देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. शिक्षणव्यवस्थेसह देशातील बेरोजगारी आणि जातीय राजकारणामुळे देशातील वातावरण दूषित झाले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या भानगडीत पडू नका. शिक्षित होणे म्हणजे चांगला माणूस बनणे होय,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, देशाची प्रगती होण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच,

‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा CJPचा प्रयत्न असल्याचे दीपके यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Cjp chief abhijit dipke statement on unemployment and school theek karo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janata Party

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke News: सौरव दास यांच्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?; CJPच्या अभिजीत दीपकेंचा सवाल
1

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
2

‘जंतर-मंतर सीजन-2’ लवकरच येणार, अभिजित दिपके यांची मोठी घोषणा
3

Abhijeet Dipke AI Surveillance: अमेरिकन AI कंपनीद्वारे माझ्यावर पाळत!; अभिजीत दीपकेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.