
ममतांच्या पार्टीत ठाकरेंप्रमाणे उभी फूट
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येताच महाराष्ट्रासारखा एक मोठा राजकीय ‘खेला’ झाला आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपला बहुमतासाठी इतर कोणताही पक्ष फोडण्याची किंवा कोणाच्या सहभागाची अजिबात गरज नाही. असे असूनही, राज्यातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये बुधवारी अखेर मोठी बंडखोरी झाली.
आमदार ऋतब्रत बॅनर्जी बंडखोर यांना ५९ आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांची भेट घेऊन समर्थन पत्र सादर केले. या पत्रावर ५९ सदस्यांच्या सह्या आहेत. बंडखोर आमदारांनी स्वतःला ‘खरी’ तृणमूल काँग्रेस म्हणवून घेत आणि ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते करण्याची मागणी केली. सूत्रांनुसार, या आमदारांच्या पत्राची दखल घेत विधानसभाध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे.
पक्षात फूट पडल्यानंतर, ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे सदस्य असलेल्या हकीम यांनी यापूर्वीच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि पक्षाध्यक्ष बॅनर्जी यांना याची माहिती दिली होती.