Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Politics: देशाच्या राजकारणात भूकंपाचे संकेत; आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

West Bengal Politics सूत्रांच्या दाव्यानुसार, सुमारे १५ ते २० आमदार अशा नेत्यांच्या संपर्कात आहेत, जे पक्षात दबाव गट स्थापन करून नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही आमदाराने जाहीरपणे बंडाची घोषणा केलेली नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 02, 2026 | 12:08 PM
West Bengal Politics, Mamata Banerjee, Trinamool Congress

West Bengal Politics, Mamata Banerjee, Trinamool Congress

Follow Us
Follow Us:

West Bangal  Politics : पश्चिम बंगालच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या उलथापालथी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण सातत्याने बदलत चालले आहे. पक्षांतर्गत राजीनाम्यांमुळे पश सत्रामुळे पश्चिम बंगलाच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसले जणू धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. अशातच आता बंगालच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत असून, थेट ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना वगळून एक ‘नवीन तृणमूल काँग्रेस’ पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पक्षांतर्गत असंतोष, बंडखोर नेत्यांच्या कारवाया आणि काही आमदारांच्या गुप्त बैठकांमुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची बंगालमध्ये पुनरावृत्ती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का; बँक पडताळणीनंतर ८१ लाख महिला अपात्र! अहिल्यानगरसह राज्यात

व्हिसलब्लोअर आमदारांवर कारवाई अन् बंडाची ठिणगी

पक्षामधील कथित सही प्रकरणावरून (Signature Case) पक्षाविरुद्ध उघडपणे आवाज उठवल्यामुळे, म्हणजेच ‘व्हिसलब्लोअर’ (Whistleblower) भूमिका घेतल्यामुळे टीएमसीने आपल्या दोन आमदारांवर कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी टीएमसीने ऋतब्रता बंदोपाध्याय आणि संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही आमदारांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाला शह देण्यासाठी पक्षातूनच एका नव्या गटाची आणि नव्या पक्षाची बांधणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

या दोन आमदारांच्या हकालपट्टीमुळे टीएमसीमधील अंतर्गत धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकांनंतर पक्षात सर्व काही सुरळीत चालले नसल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. हकालपट्टी झालेले आमदार आणि पक्षातील काही नाराज गट एकत्र येऊन नवीन राजकीय पर्याय उभा करण्याच्या तयारीत असल्यामुळे, आगामी काळात ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य नव्या पक्षाच्या चर्चेमुळे संपूर्ण पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या दाव्यानुसार, सुमारे १५ ते २० आमदार अशा नेत्यांच्या संपर्कात आहेत, जे पक्षात दबाव गट स्थापन करून नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही आमदाराने जाहीरपणे बंडाची घोषणा केलेली नाही.

CM Devendra Fadnavis News: लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थी का वगळले? मुख्यमंत्री

का केली जातेय महाराष्ट्राशी तुलना ?

बंगालमधील सध्याच्या घडामोडींची तुलना महाराष्ट्राच्या राजकारणाशी केली जात आहे. २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले, ज्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. नंतर, शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली.

त्यानंतर, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) फूट पाडून शरद पवार यांची पकड कमकुवत केली. दोन्ही प्रकरणांमध्ये, बंद दाराआडच्या बैठका, आमदारांमधील असंतोष आणि नेतृत्वाविरोधात वाढणाऱ्या नाराजीने परिस्थितीची सुरुवात झाली.

सध्या बंगालमध्येही अशाच प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. टीएमसीमध्ये स्वतंत्र सत्ताकेंद्रांचा उदय आणि निवडणुकीतील पराभवानंतर नेत्यांमधील नाराजीने या अटकळींना आणखी खतपाणी घातले आहे.

टीएमसीमध्ये खरोखरच फूट पडणार का?

राजकीय विश्लेषकांच्या मते, पश्चिम सध्या महाराष्ट्रासारख्या बंडाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे सध्या तरी कोणत्याही मोठ्या गटाने नेतृत्वाला उघडपणे विरोध केलेला नाही. कोणत्याही फुटीसाठी मोठ्या संख्येने आमदार आणि संघटनात्मक नेत्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.

तरीही, दोन आमदारांची हकालपट्टी, ममता बॅनर्जी यांनी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा केलेला जाहीर आरोप आणि असंतोषाच्या बातम्यांचा सततचा ओघ, यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की टीएमसी नेतृत्व हा धोका गांभीर्याने घेत आहे.

येत्या काही दिवसांत जर अधिक आमदारांनी बंडखोर नेत्यांना उघडपणे पाठिंबा दिला, तर पश्चिम बंगालच्या राजकारणात एक मोठे स्थित्यंतर पाहायला मिळू शकते. सध्या सर्वांचे लक्ष ममता बॅनर्जी यांच्या पुढील पावलांवर आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रित झाले आहे.

Web Title: Potential split within the trinamool congress in west bengal a political earthquake in the countrys politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Breaking News
  • Mamata Banerjee
  • National Politics
  • TMC

संबंधित बातम्या

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई
1

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन
2

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन

Pune : पुण्यात गाड्यांची तोडफोड, 18 जणांवर गुन्हा दाखल
3

Pune : पुण्यात गाड्यांची तोडफोड, 18 जणांवर गुन्हा दाखल

Gyanvapi Case: ज्ञानवापी, मथुरा अन् संभल वादात मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला; हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांचा ‘या’ कारणासाठी नकार
4

Gyanvapi Case: ज्ञानवापी, मथुरा अन् संभल वादात मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला; हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांचा ‘या’ कारणासाठी नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.