Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) मोठी फूट पडली असून बंडखोर नेते ऋतब्रत बॅनर्जी यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 03, 2026 | 05:57 PM
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट (Photo Credit- X)

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप!
  • तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट
  • बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते
West Bengal Politics News: पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या एका अत्यंत धक्कादायक आणि मोठ्या घडामोडीमुळे अभूतपूर्व राजकीय उलटफेर पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला असून पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी (Ritabrata Banerjee) यांच्यासह ५८ बंडखोर नेत्यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची विधानसभेचे नवे ‘विरोधी पक्षनेते’ (Leader of Opposition) म्हणून घोषणा केली आहे.

ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ६० आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रवीन्द्र नाथ बोस यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. “आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत,” असा दावा करत त्यांनी बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाची मान्यता देण्याची मागणी केली होती. ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपल्याकडे ६० आमदारांचे बळ असल्याचा दावा केला असून, आमदार अखरुज्जमान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद (Chief Whip) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र अध्यक्षांकडे सुपूर्द

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी, संदीपन साहा आणि इतर अनेक असंतुष्ट आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना ५८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले अधिकृत समर्थन पत्र सुपूर्द केले. या पत्रासोबतच त्यांनी बंडखोर गटाच्या नवीन कोअर टीमचा प्रस्तावही अध्यक्षांसमोर ठेवला. या नव्या रचनेनुसार, ऋतब्रत बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी, तर जावेद खान, संदीपन साहा आणि शिउली साहा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच रघुनाथगंजचे आमदार अखरुज्जमान यांच्याकडे मुख्य सचेतक पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Karnataka Politics: कर्नाटकात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात! डी. के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

ममता बॅनर्जींच्या आंदोलनाकडे बंडखोरांची पाठ

हा संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामा विधानसभा आवारात झालेल्या बंडखोर आमदारांच्या गुप्त बैठकीनंतर समोर आला. विशेष म्हणजे, मंगळवारीमध्य कोलकात्यात माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या जाहीर धरणे आंदोलनाकडे या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच आमदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. दुसरीकडे, ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे ज्येष्ठ नेते शोभनदेव चटोपाध्याय, नयना बंदोपाध्याय, मदन मित्रा आणि कुणाल घोष यांनी बुधवारच्या या विधिमंडळ बैठकीपासून स्वतःला लांब ठेवले.

पक्षांतर बंदी कायद्याचेगणित

पक्षांतर बंदी कायद्याच्या कडक नियमांनुसार, विधिमंडळात कोणत्याही वेगळ्या गटाला किंवा फुटीर गटाला कायदेशीर अपात्रतेपासून वाचण्यासाठी मूळ पक्षाच्या एकूण आमदार संख्येच्या किमान दोन-तृतीयांश (२/३) सदस्यांचे समर्थन असणे अनिवार्य असते. तृणमूल काँग्रेसच्या एकूण ८० आमदारांचा विचार करता, ही कायदेशीर मर्यादा ५४ आमदारांवर येऊन थांबते. बंडखोर गटाने ५८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केल्यामुळे त्यांनी हा तांत्रिक टप्पा यशस्वी पार पाडल्याचे दिसत आहे.

निलंबनाच्या कारवाईनंतर बंडखोरीचा भडका

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ममता बॅनर्जी यांनी ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन शाह यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित केले होते. या कारवाईनंतरच पक्षांतर्गत धुसफूस वाढली आणि बंडखोरीचा अधिकृत भडका उडाला. नवे विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही सभागृहात आणि राज्यामध्ये एक सक्षम व जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावणार आहोत. आमचे राजकारण हे केवळ विरोधाला विरोध करणारे नसेल, तर पश्चिम बंगालच्या जनतेसाठी आम्ही पूर्णपणे सकारात्मक राजकारण करू.”

Mamata Banerjee: “थांबा, यापेक्षा मोठा ‘खेळ’ करणार…” ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा; बंगाल पोलिसांवरून हिटलरशी केली तुलना

Web Title: West bengal politics tmc split ritabrata banerjee new opposition leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • political news
  • TMC
  • West bengal

संबंधित बातम्या

Karnataka Politics : डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधींसोबत चर्चा
1

Karnataka Politics : डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधींसोबत चर्चा

National Politics: देशाच्या राजकारणात भूकंपाचे संकेत; आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर
2

National Politics: देशाच्या राजकारणात भूकंपाचे संकेत; आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत
3

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत

Mamata Banerjee: “थांबा, यापेक्षा मोठा ‘खेळ’ करणार…” ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा; बंगाल पोलिसांवरून हिटलरशी केली तुलना
4

Mamata Banerjee: “थांबा, यापेक्षा मोठा ‘खेळ’ करणार…” ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा; बंगाल पोलिसांवरून हिटलरशी केली तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.