
Maharashtra Politics: "माझे 1000 रुपये अजून..."; ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची जहरी टीका
ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य
आमचे हिंदुत्व व्यापक – मुख्यमंत्री फडणवीस
लवकरच युतीची घोषणा होणार – फडणवीस
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवीन युतीचा जन्म झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीयआधी दोन्ही ठाकरे बंधु एकत्रित आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते दोघे एकत्र येण्याने राजकीय दृष्ट्या फार मोठे काही घडेल असा कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. काही माध्यमे तर जसे काही रशिया आणि युक्रेनची युती होत आहे असेच दाखवत होते. अस्तित्व टिकवण्यासाठी झालेली ही युती आहे.”
🕑 2.05pm | 24-12-2025📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/EVij4pROXA — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 24, 2025
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे. जय प्रकारे मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचे काम आणि पाप यांनी केले आहे. त्यामुळे मराठी माणूस यांच्यासोबत नाही. येत्या निवडणुकीत त्यांना 25 वर्षांचा हिशेब द्यावा लागणार आहे. मुंबईकर त्यांच्यासोबत येणार नाहीत. भावनिक आवाहनाला प्रतिसाद देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी विकासावर बोलावे. ते जर विकासावार बोलले तर मी 1000 रुपये बक्षीस देईन असे म्हटले होते. मात्र माझे 1000 रुपये अजून वाचलेले आहेत.”
राज ठाकरेंकडून घोषणा
राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली.
सुरूवातीला शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. “आम्ही दोघेही आज इथे बसलो आहोत. आमचे आजोबा प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत संघर्ष केला. मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. कारण मुंब महाराष्ट्राला मिळाल्यावर उपरे महाराष्ट्राच्या उरावर नाचायला लागले त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म द्यावा लागला.