Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट… दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत तळ ठोकून !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवार, २८ मे) नवी दिल्ली येथे भेट घेतली. राज्याच्या विकासावर यावेळी चर्चा करण्यात आली असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 02:43 PM
Cm Devendra Fadnavis meets PM Narendra Modi

Cm Devendra Fadnavis meets PM Narendra Modi

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील नवी दिल्लीत तळ ठोकून
  • शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा – मुख्यमंत्री फडणवीस
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या सतरा जागांमध्ये जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही मित्रपक्षांमध्ये आलबेल नसल्याचे दिसत आहे. अश्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवार, २८ मे) नवी दिल्ली येथे भेट घेतली. राज्याच्या विकासावर यावेळी चर्चा करण्यात आली असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत. याशिवाय राज्यातील इतर मंत्रीसुद्धा नवी दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहे. म्हणूनच ‘विधान परिषदेतील जागावाटपावरील वाद’ याविषयावर हि भेट झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल (बुधवार, २७ मे) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे ऊस व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर आज लगेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

आमचे नेते आणि देशाचे लाडके मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची… pic.twitter.com/4OZJTVrcm0 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 28, 2026

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीची माहिती दिली. ते यावेळी म्हणाले, “आमचे नेते आणि देशाचे लाडके मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे असते. त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार!”

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले

राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी, पेट्रोल डिझेलचा तुटवडा आणि दरवाढ तसेच मराठा आरक्षण यांसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांच्या नेतृत्वात आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात येत आहे. साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवरील अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, याबाबत केंद्र सरकार लवकरच अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

Web Title: Cm devendra fadnavis meets pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Amit Shah
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Naredra Modi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?
1

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
2

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?
3

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?

Ashadi Wari New Song: विठ्ठलनामाचा गजर, भक्तीचा सुरेल सोहळा! ‘पालखी निघाली वारीला’ प्रेक्षकांच्या भेटीला
4

Ashadi Wari New Song: विठ्ठलनामाचा गजर, भक्तीचा सुरेल सोहळा! ‘पालखी निघाली वारीला’ प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.