Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nari Shanki Vandan : “देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक; CM देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले मत

संसदेमध्ये सादर होत असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे पंतप्रधान मोदींचे यश असल्याचे ते म्हटले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 04:19 PM
मोठी बातमी ! फडणवीसांच्या 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

मोठी बातमी ! फडणवीसांच्या 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

Follow Us
Follow Us:
  • महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
  • ‘नारी शक्ती वंदन महिला संमेलनात उपस्थिती
  • पंतप्रधान मोदींवर व्यक्त केला विश्वास
 

Women Reservation Bill : मुंबई : संसदेमध्ये महिला आरक्षणावर विधेयक सादर केले जात असून यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन झाले होते पण त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ठोस इच्छाशक्ती दाखवली, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.

 

नारीशक्ती विचार मंच आयोजित ‘नारी शक्ती वंदन महिला संमेलन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “नारीशक्ती वंदन विधेयकामुळे भविष्यात देशातील महिलांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गोष्टीत ऐतिहासिक बदल घडणार असून संसद व राज्य विधिमंडळात मोठ्या प्रमाणात महिला लोकप्रतिनिधी निवडून येतील. त्यामुळे महिलांच्या विकासाला आणि नेतृत्वाला नवी गती मिळेल, ‘नारीशक्ती वंदन विधेयक’द्वारे परिवर्तनासाठी सर्वांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

हे देखील वाचा : लोकसभा गाजणार! सत्ताधाऱ्यांकडून अमित शाह तर विरोधकांकडून प्रियांका गांधी भिडणार

सध्या लोकसभेत ७३ महिला खासदार असून, २०२९ मध्ये जवळपास 273 महिला खासदार असतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. जर हे विधेयक तत्काळ आणले नसते, तर ते २०२९ नंतर किंवा अगदी २०३४-२०३९ पर्यंत लांबले असते, असेही त्यांनी नमूद केले. पूर्वी महिला आरक्षण विधेयक सादर झाले असता त्यास अपेक्षित यश मिळाले नाही. तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रथम हे विधेयक मांडले होते, पण बहुमताअभावी ते पारित होऊ शकले नाही. नंतरच्या सरकारच्या कार्यकाळातही बहुमत असतानाही ते पारित होऊ शकले नव्हते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

काहीजण जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) मुद्द्यावरून अप्रत्यक्ष विरोध करत असले, कोरोना महामारीमुळे २०२१ ची जनगणना न झाल्यानंतरही २०११ च्या जनगणनेच्या आधारे हे विधेयक येत आहे. आता डिलिमिटेशनची प्रक्रियाही सुरू होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या उपक्रमांपासून सुरुवात करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेतले. लिंग गुणोत्तर सुधारण्यापासून ते मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक पावले उचलण्यात आली असून ‘लखपती दीदी’सारखे उपक्रम हे या प्रयत्नाचाच भाग आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातही सध्याच्या काळात पहिल्यादाच अतिशय जबाबदारीच्या व महत्त्वपूर्ण पदावर महिला पोहोचल्या आहेत.महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, पहिल्या पोलीस महासंचालक, पहिल्या बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त ही पदे महिलांनी कर्तुत्वाने मिळवली आहेत. महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सुरुवातीला ‘सरपंच पती’ किंवा ‘नगरसेविका पती’ यांसारख्या प्रवृत्ती दिसून येत होत्या; मात्र कालांतराने महिला स्वतःच्या क्षमतेवर निवडून येऊन प्रभावीपणे कार्य करू लागल्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : महिला आरक्षणाच्या आडून सत्ताधाऱ्यांची राजकीय चाल? ‘हे’ मुद्दे चर्चेत

नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात एम्समधील आठपैकी सहा सुवर्णपदके विद्यार्थिनींनी मिळवली, याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सैन्यदल, अंतराळ संशोधनासह प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. संधी दिल्यास महिला कोणतेही क्षेत्र गाठू शकतात, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध क्षेत्रातील नामांकित महिलांनीही यावेळी आपल्या विचारांमधून महिलांच्या सक्षमीकरणाची गरज अधोरेखित केली. याप्रसंगी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या महिला व्यक्तिमत्त्वांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Web Title: Cm devendra fadnavis reaction on women reservation bill maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nari Shakti Vandan
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 
1

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?
2

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
3

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
4

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.