Maharashtra Politics: ".... ते लक्षात घेत नाहीत"; फडणवीसांनी पडळकरांना 'त्या' वक्तव्यावरून खडसावलं
गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर फडणवीस यांचे भाष्य
पडळकर यांचे जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान
शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन
Devendra Fadnavis On Gopichand Padalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही ना काही घडतंय आपल्याला पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरस पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यातचे राजकारण तापले आहे. जयंत पाटील यनहचयावर बोटळणा पडळकर यांची जीभ घसरली आहे. शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केल्याचे समजते आहे. दरम्यान आता या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या वडिलांचे नाव घेत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. राजाराम पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत एकेरी आणि अर्वाच्च भाषा वापरली. गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून जयंत पाटलांवर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातले राजकारण कोणत्या थराला चालले आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पडळकर हे कायमच कोणत्या न कोणत्या विधानामुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
LIVE | Inauguration of 'AIIFA Steelex 2025 – A Steel Mahakumbh' at the hands Hon Union Minister Pralhad Joshi ji
🕐 12.49pm | 19-9-2025📍Mumbai. @JoshiPralhad @SteelEx_AIIFA#Maharashtra #SteelIndustry #AIIFASteelex2025 https://t.co/VfYo45PNPO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2025
दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते योग्य आहे असे माझे मत नाही. कोणाच्याही परिवाराबद्दल विधान करणे योग्य नाहीये. या संदर्भात पडळकरांशी मी बोललो आहे. मला शरद पवारांचा फोन आला होता. या प्रकारच्या विधानांचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही, असे मी त्यांना सांगितले.”
Fadnavis On Rahul Gandhi: फडणवीसांनी हायड्रोजन बॉम्बची हवाच काढली; म्हणाले, “लवंगी फटाका देखील…”
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर हे तरुण नेते आहेत. अत्यंत आक्रमक असे नेते आहेत. आक्रमकपणे बोलत असताना याचा काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. या गोष्टी लक्ष ठेवूनच आक्रमकपणे बोलले पाहिजे. भविष्यात तुम्हाला चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. मत चोरी नाही तर राहुल गांधी यांचे डोक्याची चोरी झाली आहे. त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत. त्यांना देशाच्या संविधानाप्रती काहीही आदर नाही.”