फडणवीस यांचे राहुल गांधींच्या आरोपांवर भाष्य (फोटो-सोशल मीडिया)
1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर
2. हायड्रोजन बॉम्ब पोकळ असल्याचे भाष्य
3. पुरावे असल्यास कोर्टात जाण्याचा सल्ला
Rahul Gandhi On Election Comission: कॉँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत हायड्रोजन बॉम्ब फोडला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ज्या ठिकाणी कॉँग्रेस जिंकत होते त्या ठिकाणची मते वळवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी याचे आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाष्य केले आहे.
🕖 6.53pm | 18-9-2025📍Mumbai.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/cYBRj6OoFi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 18, 2025
राहुल गांधी यांच्या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब सांगितलं होता. हे आता कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार यामुळे भारत घाबरला होता. पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत. त्यांनी फुसका बार लावला आहे. राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. रोज खोटे बोलायचे हा त्यांचा प्रयत्न असतो. ”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “इतक्या वेळा निवडणूक आयोगानेत्यांनी नोटिस दिली. मात्र राहुल गांधी आजवर एकही पुरावादेऊ शकलेले नाहीत. निवडणूक आयोग असेल किंवा कोर्ट असेल ते पुरावे देऊ शकलेले नाहीत. तरीही प्रत्येक वेळेस माध्यमांसमोर येऊन खोट बोलण्याच्या त्यांच्या हिमतीचे मी कौतुक करतो. या प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीच पाहिलेला नाही. ते कितीही खोटे बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. असेच खोटे बोलत राहिले तर कधीच त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही.”
शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे ऐकले नाही तर त्यांनी कोर्टात गेले पाहिजे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते जिंकतात तेव्हा ते आरोप करत नाहीत. हरतात तेव्हाच ते आरोप करतात. ईव्हीएमवर आरोप करतात. मात्र हे मशीन मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुरू झाले होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ईव्हीएमवर मतदान सुरू झाले.
आता यांना त्यांच्या काळात सुरू झालेली प्रक्रिया चुकीची आहे असे म्हणायचे आहे का? ते म्हणतात हे सगळे १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. १५ वर्षांपूर्वी कोण सतेत होते? यूपीए सरकार होते. म्हणजे ते त्यांच्याच सरकारवर आरोप करायचे आहेत का? आरोप करून चालणार नाही. पुरावे दिले पाहिजेत. कर्नाटक, तेलंगणामध्ये जिंकल्यावर त्यांनी आरोप केले नाहीत. लोकसभेत आम्ही हरलो तेव्हा आम्ही आरोप केले नाहीत.