Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “भाजपमुळेच महागाईचा…”; कॉँग्रेस नेत्याची पनवेलमध्ये जोरदार टीका

भाजपमुळेच महागाईचा भस्मासुर वाढलाय. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2025 | 03:20 PM
Maharashtra Politics: “भाजपमुळेच महागाईचा…”; कॉँग्रेस नेत्याची पनवेलमध्ये जोरदार टीका
Follow Us
Close
Follow Us:

रायगड जिल्हा काँग्रेसची आढावा पार पडली बैठक
कामगार नेते महेंद्र घरत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
कॉग्रेस स्वबळावरही लढण्यास तयार

पनवेल: “राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. भाजपमध्ये आमदारालाही बोलता येत नाही, त्यांची चिडीचूप अशी अवस्था आहे. मात्र काँग्रेसमध्ये सन्मान आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची मुभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, कॉंग्रेसमध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहा,” असे प्रतिपादन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी शेलघर येथे केले. शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिरात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.

अर्जाची छाननी करूनच मग उमेदवारी

यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना महेंद्र घरत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांनी अर्ज भरावेत. सर्व अर्जाची छाननी करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल.” त्यांनी पक्षातील शिस्त, निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या तीन घटकांवर विशेष दिला.

Maharashtra Politics: कोकणात महायुती डळमळणार; ‘या’ नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळाचा नारा देणार?

काँग्रेस स्वबळावरही लढण्यास तयार

यावेळी रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, “काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना ताकद मिळाली आहे. तालुका अध्यक्ष हे संघटनाचे केंद्रस्थान आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उमेदवार सक्षम, जनाधार असलेला आणि समाजाशी नाते जपणारा हवा. परिस्थितीनुसार काँग्रेस स्वबळावरही लढण्यास तयार आहे. कॉंग्रेस हा एक परिवार आहे आणि प्रत्येक सदस्य त्याचा अविभाज्य भाग आहे.”

भाजपावर केली थेट टीका
यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी भाजपवर थेट टीका करत म्हटले, “भाजपमुळेच महागाईचा भस्मासुर वाढलाय. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही, अशा भावना जनतेत आहेत.”

मतदार याद्यांतील घोळांवरही कार्यकर्त्यांकडून मते व्यक्त

या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांतील घोळ, निवडणुकीची तयारी आणि उमेदवारीबाबत आपली मते मांडली. “तिकीट मिळो वा न मिळो, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांबद्दल उत्साह आणि चैतन्य जाणवत होते. या बैठकीला रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल, प्रदीप राव (प्रभारी अलिबाग विधानसभा), डॉमिनिक डिमेलो (प्रभारी उरण विधानसभा), मनोज कांबळे (प्रभारी पेण विधानसभा), अशोक मोरे (प्रभारी श्रीवर्धन विधानसभा), सुरेश काटकर (प्रभारी महाड विधानसभा), सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, ऍड. श्रद्धा ठाकूर, डॉ. मनीष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखा घरत, नंदराज मुंगाजी, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अखलाक सिलोत्री, निखिल ढवळे व तालुका अध्यक्ष, तसेच रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Congress critcizes to bjp panvel local body elections maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Local Body Election 2025
  • panvel

संबंधित बातम्या

गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…
1

गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा
2

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल
3

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले
4

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.