Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समाजामध्ये तेढ निर्माण होणारी वक्तव्य केली तर…; अजित पवारांची महायुतीच्या नेत्यांना तंबी

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेय त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. सध्या राजकीय टीका करताना वैयक्तिक आणि धार्मिक टीका करण्याचे प्रमाण वाढले आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच वादग्रस्त विधानांबाबत सावध राहण्याचे सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 12, 2024 | 06:35 PM
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. जनसन्मान यात्रेमधून ते विरोधकांवर निशाणा साधत आहे. तर आळंदी येथील कार्यक्रमातून अजित पवार यांनी महायुतीच्याच नेत्यांना दणका दिला आहे. “कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये” अशा सूचना अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. अजित पवार यांनी महायुतीमधील नेत्यांना धर्मांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला आहे. मध्यंतरी आमदार नितेश राणे यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केल्यामुळे अजित पवार यांचा राणेंना टोला असल्याचे बोलले जात आहे.

….समाजांमध्ये तेढ निर्माण करता

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आळंदीमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते, तेव्हा त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होते. हे होता कामा नये. तुम्हाला तुमच्या विचारधारा मांडायच्या असतील तर तुम्ही मांडू शकता. तुम्हाला त्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मत मांडायला हरकत नाही. परंतु, तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करता. समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगलं नाही,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता 

पुढे ते म्हणाले की, “हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. अशी तेढ निर्माण करणारी वक्तव्य महाराष्ट्र कदापी खपवून घेणार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्या गोष्टींचा तीव्र विरोध करत राहील. कठोर शब्दांत आम्ही त्यांचा विरोध करू. तसेच अशा प्रकरणांमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असेल ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही,” अशी तंबी अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना दिली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केलीं होती. राणे यांनी मुस्लिम धर्मियांबाबतीत बदनामीकारक घोषणा दिल्याचे तक्रारीमध्ये सांगण्यात आले. विविध ठिकाणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता अजित पवार यांनी नेत्यांना सावध करत ताकीद दिली आहे.

Web Title: Dcm ajit pawar indirectly target nitesh rane over controversial statements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 06:35 PM

Topics:  

  • ajit pawar
  • DCM Ajit Pawar
  • Nationalist Congress Party
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
1

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.