DCM Eknath Shinde visits Delhi after ED notice to MP Shrikant Shinde
Shrikant Shinde ED Notice : मुंबई : राज्यामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवरुन चर्चा सुरु आहे. राजकीय चर्चा आणि निर्णयावरुन वाद सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्व पूर्वनियोजित दौरे रद्द करत हा दिल्ली दौरा केला आहे. यामध्ये आता धक्कादायक कारणाचा दावा केला जात आहे.
राज्यातील काही नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. यामध्ये शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांचा समावेश आहे. संजय शिरसाट यांच्या मालमत्तेमध्ये झालेल्या वाढीवरुन त्यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी देखील दुजोरा दिला असून सिद्धांत शिरसाट यांच्या ‘विट्स हॉटेल’ची चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ते केवळ 67 कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप होत आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. असे असताना आता आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील ईडीची नोटीस आल्याची चर्चा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर विभागाने नोटीस बजावली असल्याची चर्चा आहे. याबाबत शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीच दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना नोटीस बजावल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्ली गाठली असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संजय शिरसाट यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांनी अवघ्या काही वेळात आपले वक्तव्य मागे घेतले. मात्र यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ शिंदे काल (बुधवार) दिल्लीचा दौरा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केंद्रातील अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली. या दिल्लीवारीमागचं आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. ‘दिल्लीवारी नेमकी कशासाठी हे अजून कळू शकलेलं नसलं तरी या दौऱ्यामुळे एक विशेष महत्त्व आलेलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागील कारण गुलदस्त्यात आहे. शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारीमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नियोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.