Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati by-electionची रणधुमाळी सुरु असताना सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर; फडणवीसांनी दिला शब्द

Sunetra Pawar meet CM Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2026 | 01:53 PM
DCM Sunetra Pawar meets cm devendra fadnavis at varsha bunglow in baramati by election 2026

DCM Sunetra Pawar meets cm devendra fadnavis at varsha bunglow in baramati by election 2026

Follow Us
Follow Us:
  • DCM सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर दाखल
  • सुनेत्रा पवार आणि सीएम देवेंद्र फडणवीसांची भेट
  • भाजप कायम सोबत असल्याचा फडणवीसांचा शब्द
Sunetra Pawar meet CM Fadnavis : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक (Baramati By election) जाहीर झाली आहे. यामध्ये 50 हून अधिक उमेदवार रिंगणात असल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची डोकेदुखी वाढली. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीला रंगत आली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

बारामती पोटनिवडणुकीमध्ये घरचा सदस्याचे निधन झाल्यामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला. मात्र महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन बारामतीच्या निवडणुकीमध्ये चुरस आणली. सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना स्वतः फोन केल्यानंतर देखील त्यांनी उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

हे देखील वाचा : राजकारण तापले! सुनेत्रा पवारांविरोधात करुणा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. यावेळी राज्यसभा खासदार पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वाचा शब्द दिला. मीडिया रिपोर्टनुसार, बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत सांगितले आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 55 उमेदवार रिंगणात उतरले आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कॉंग्रेस उमेदवार आकाश मोरे आव्हान देणार आहेत. याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अभिजित बिचुकले यांचाही समावेश आहे. यामध्ये लक्ष्मण हाके हे देखील इच्छूक होते. मात्र त्यांना राजकीय समज दिल्यानंतर हाकेंनी माघार घेतली.

हे देखील वाचा :  : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रसेनी पार्थ पवारांना धरलं धारेवर

पार्थ पवारांचा संताप
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे या पोटनिवडणुकीला दुःखाची किनार आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करुन देखील महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. यामुळ पार्थ पवारांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हा कॉंग्रेसचा डाऊनफोल आहे आणि म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय स्थिती असल्याची टीका पार्थ पवारांनी केली.यामुळे कॉंग्रेसने देखील सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे पार्थ पवार आणि काँग्रेस पक्षामध्ये राजकीय वादंग निर्माण झाल्याचे दिसून आले.

Web Title: Dcm sunetra pawar meets cm devendra fadnavis at varsha bunglow in baramati by election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • devendra fadnavis
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
1

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
2

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
3

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
4

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.