करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल (फोटो- सोशल मिडिया)
बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध नाहीच
करुणा मुंडे यांनी देखील भरला उमेदवारी अर्ज
23 एप्रिलला मतदान तर 4 मे ला निकाल जाहीर होणार
बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण ५५ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (दि ६) शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून माजी आमदार ॲड विजयराव मोरे यांचे चिरंजीव ॲड आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान करुणा मुंडे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीच्या आज झालेल्या मेळाव्यात सर्वच वरिष्ठ नेत्यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत बिनविरोध निवडणूक न झाल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sunetra Pawar PC: दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन
सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन
“दादां शब्दांला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षीला ठेवूनच शब्द देते, पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही. संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे, सर्व बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. कुटुबाच्या विकासासाठी मी झटत राहिल हा माझाही शब्द आहे.’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना शब्द दिला. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करायचे आहे. यापूर्वी बारामतीत आज राष्ट्रवादीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ” दादांच्या अचानक जाण्याचे अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचलं पण काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचा जनता दरबार यापुढेही सुरू राहिलं. त्यांच्या जाण्याचे अस्वस्थतेचं वातावरण होतं. आजही तसेच वातावरण आहे. व्यापारी, शेतकरी, कामगार महिला. तरूण, सगळेच हवालदिल झाले होतं आपण आजही मी ठामपणे सांगते, बारामतीचा विकास तितक्याच वेगाने सुरू राहिल. बाजारपेठेतील उलाढाल गतीमान राहण्यासाठी नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत येण्यासाठी मी सर्व पातळीवर लक्ष देईन. दादांचा प्रशासनावर आदरयुतक्त दरारा होता. त्यामुळे शासकीय कामे वेळेत होत होती. ती शिस्त यापुढेही कायम राहिल, प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची काम वेळेत होतील याची खात्री बाळगा.”






