Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वादाला तोंड फुटणार? संभाजी ब्रिगेडने नावात छत्रपती लावावे, अन्यथा…; शिवधर्म फाउंडेशन आक्रमक

राज्यामध्ये संभाजी ब्रिगेड अनेकदा राजकीय विषयांवर परखड भूमिका घेताना दिसते. मात्र आता त्यांच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असल्यामुळे नवीन वाद उफाळला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2025 | 06:24 PM
Demand to change the name of Sambhaji Brigade Maharashtra Political News

Demand to change the name of Sambhaji Brigade Maharashtra Political News

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : इतिहासामध्ये घडलेल्या अनेक घटनांवरुन सध्या राज्याचे राजकारण रंगले आहे. औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या राजकारणी आक्रमक झाले आहेत. अनेकांनी ही कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर ही कबर काढता येणार नाही ती ASI अंतर्गत संरक्षित असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. आता संभाजी बिग्रेडच्या नावावरुन नवा वाद सुरु झाला आहे.

महाराष्ट्रात ‘संभाजी ब्रिगेड’ या नावाने कार्यरत असलेल्या संघटना व पक्षाकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ने नावात बदल करून ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ असे करावे किंवा संघटनेचे नाव बदलावे. अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनने दिला आहे. शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत घेत यावरुन मत मांडले आहे. यावेळी फाऊंडेशनचे प्रतिभा पाटील, आरती जयस्वाल, नाना वाघेरे, प्रकाश आंधळकर, विष्णु कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी दीपक काटे म्हणाले, “अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतवासीयांसाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रात मात्र, ‘संभाजी ब्रिगेड’ छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करून, भेटी घेऊन पाठपुरावा केला आहे. मात्र, संघटनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे व अन्य पदाधिकारी एकीकडे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला कठोर शासन करण्याची, तसेच महाराष्ट्रात राहू न देण्याची भाषा करतात. मात्र, स्वतःच्या संघटनेच्या नावात महाराजांचा एकेरी उल्लेख सर्रासपणे करतात. त्यात बदल करण्याची मागणी केली, तर त्याकडे दुर्लक्ष करतात.” असे मत दीपक काटे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “संघटनेने ‘संभाजी ब्रिगेड’च्या नावात ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असे पूर्ण लिहावे. संघटनेने नावात बदल केला नाही, तर त्या संघटनेची व पक्षाची नोंदणी तात्काळ रद्द करावी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी, तसेच अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. शिवभक्त, शंभूभक्तांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ‘संभाजी ब्रिगेड’च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने येत्या 03 एप्रिल 2025 पासून राज्यभरात आंदोलन छेडले जाणार आहे. पुण्यासह, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल,” असे दीपक काटे यांनी सांगितले. यामुळे आता राज्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर आता संभाजी ब्रिगेडकडून काय उत्तर दिले जाणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: Demand to change the name of sambhaji brigade maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Maharaj
  • maharashtra news
  • Sambhaji Brigade

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
4

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.