Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : जिल्ह्यात ‘Tree Army’ची हरित क्रांती! ‘पिंपळाचे पुनर्वसन ते लोकचळवळ’, आमदार सुहास बाबर यांचा पुढाकार

Sangli जिल्ह्यात ‘Tree Army’च्या माध्यमातून अनोखी हरित क्रांती उभी राहत असून, पिंपळाच्या झाडांच्या पुनर्वसनातून ही चळवळ आता मोठ्या लोकआंदोलनात बदलली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 06:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • संकल्पाचे रूपांतर मोठ्या लोकचळवळीत झाले
  • आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकाराने ही चळवळ सुरु
  • एकूण ७८,००० हून अधिक झाडे या उपक्रमात लावण्यात येणार
सांगली जिल्ह्यात एक आगळीवेगळी चर्चा रंगली आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघात घडणाऱ्या ‘हरित क्रांती‘कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आडनिड्या जागेवर पिपळाच्या झाडांची वाढ झाली आहे. परंतु, त्यांना तोडून कमी करण्यापेक्षा त्यांची पुनर्स्थापना करण्यात येत आहे. आता या संकल्पाचे रूपांतर मोठ्या लोकचळवळीत झाले आहे, तसेच या चळवळीला ‘Tree Army’ असे संबोधले जात आहे. हजारो सांगलीकर या उप्रक्रमात सहभाग घेत आहेत. तरुण आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकाराने ही चळवळ सुरु झाली आहे.

Manoj Jarange Andolan : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर! मनोज जरांगेंची आंदोलनाची हाक; 30 मे रोजी राज्यभर रणशिंग फुंकणार

मताधिक्याएवढ्या वृक्षलागवडीचा संकल्प

दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचा वारसा जपणारे आमदार सुहास बाबर यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना एकूण ७८,१७८ मते मिळाली होती. या मताधिक्यांची परतफेड म्हणून आणि निसर्गाला भेट म्हणून त्यांनी मिळालेल्या मताधिक्याएवढ्या वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेतला आहे. आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मताधिक्याएवढी झाडे लावण्याचे आमदार सुहास बाबर यांचे ध्येय आहे. एकंदरीत, एकूण ७८,००० हून अधिक झाडे या उपक्रमात लावण्यात येणार आहेत.

ट्री आर्मी : पर्यावरणासाठी उभी राहिलेली लोकचळवळ

MLA Suhas Babar यांनी सोशल मीडियावर ‘पिंपळाची गोष्ट’ हा उपक्रम सुरू केल्यानंतर या हरित मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला. लोक स्वतःहून जागा उपलब्ध करून देत असून, पाणी आणि श्रमदानासाठीही पुढाकार घेत आहेत. त्यामुळे ‘ट्री आर्मी’ आता एक शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून उभी राहिलेली चळवळ बनली आहे.

या मोहिमेत आमदार बाबर यांनी वैयक्तिक योगदान देत मातोश्रींच्या श्राद्धदिनी तब्बल ५,३०० आंब्याची कलमे लावली. तसेच विटा नगरपालिकेतील एका नगरसेवकाने चार वर्षे वयाची ५२ झाडे भेट दिली, तर आळसंद ग्रामपंचायतीने ५०० झाडांचे रोपण केले आहे. पर्यावरण संवर्धनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्याने एक एकर जागेत जपानी पद्धतीचे ‘मियावकी जंगल’ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय रस्ता रुंदीकरणामुळे नष्ट झालेल्या ‘ग्रीन टनेल’चे पुनरुज्जीवन करून रस्त्यांवरील हिरवाई पुन्हा निर्माण करण्याचे ध्येयही या मोहिमेत ठेवण्यात आले आहे.

मिरा-भाईंदरमध्ये पुतळ्यावरून रणकंदन! “व्यापारी स्वार्थासाठी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा डाव”; प्रताप सरनाईकांचा भाजपवर घणाघात

५ जूनला ‘वसुंधरा दिना’निमित्त विशेष वृक्षलागवड मोहीम

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत येत्या ५ जून रोजी वड, पिंपळ, बहावा, करंज आणि चिंच यांसारख्या स्थानिक व सावलीदार वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणार आहे. ‘ट्री आर्मी’च्या माध्यमातून केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर झाडांचे संगोपन, संवर्धन आणि दीर्घकालीन जतन यावरही विशेष भर दिला जात आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या नागरिकांनीही आपल्या मातीतल्या या हरित उपक्रमात सहभागी होऊन गावाशी असलेली नाळ अधिक घट्ट करावी, असे आवाहन Suhas Babar यांनी केले आहे.

Web Title: Sangli tree army green revolution suhas babar peepal tree rehabilitation movement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Pimpal tree
  • Sangali News

संबंधित बातम्या

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
1

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात
2

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
3

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
4

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.