Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी महाराष्ट्रातच राहणार’, असे सांगत त्यांनी दिल्लीवारीच्या चर्चांवर टीकाकारांना मिश्कील टोला लगावला.

  • By विवेक
Updated On: Aug 18, 2026 | 08:17 PM
मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; 'त्या' 314 नियुक्त्याच केल्या रद्द

मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; 'त्या' 314 नियुक्त्याच केल्या रद्द

Follow Us
Follow Us:
  • ‘मी मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार’, फडणवीसांचे स्पष्ट वक्तव्य.
  • दिल्लीतील जबाबदारीच्या चर्चेवर टीकाकारांना ‘रिकामटेकडे’ म्हणत टोला.
  • संजय राऊतांनी केंद्रातील संभाव्य जबाबदारीबाबत केला होता दावा.
 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच जोर आला आहे. फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, तसेच शिक्षण खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. मात्र, या चर्चांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी आपल्या दिल्ली जाण्याच्या चर्चेवर मिश्कील प्रतिक्रिया दिली. “अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या,” अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना टोला लगावला.

‘मी मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार’

देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्र सोडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांचे स्पष्टपणे खंडन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर राज्याची जबाबदारी सोपवली असून, ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde Marathi Speech: मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान

विरोधकांच्या चर्चेवर मिश्कील उत्तर

फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह काही केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांना केंद्रात पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले.

याबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी, “ज्यांना फुगे उडवायचे आहेत, पतंग उडवायची आहे, त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रातच आहे,” अशी भूमिका मांडली.

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ

संजय राऊतांचा वेगळा दावा

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारासोबत महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आगामी काळात फडणवीस यांच्याकडे दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असा दावा राऊत यांनी केला होता.

मात्र, फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्यामुळे सध्या तरी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरच कायम राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पुढे नेमके कोणते राजकीय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Devendra fadnavis delhi shift rumours maharashtra cm reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
1

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
2

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात
3

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
4

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.