Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis Press : नरेंद्र मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल…; राऊतांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis Press : देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसदार वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2025 | 07:41 PM
Devendra Fadnavis press response on political heir of PM Narendra Modi from Maharashtra

Devendra Fadnavis press response on political heir of PM Narendra Modi from Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.30) नागपूर दौरा केला. यावेळी त्यांनी संघ मुख्यालय असलेल्या रेशीमबागला आणि दिशाभूमीला भेट दिली. यावेळी संघामुळे गुलामीच्या बेड्या तुटल्या म्हणत पंतप्रधान मोदींनी संघकार्याचे मोठे कौतुक केले. तसेच सेवा कार्य आणि समाज कार्याबाबत कौतुक करत संघ हा वटवृक्ष असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता मात्र राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांचा नागपूरमध्ये माध्यमसंवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्या मेळाव्य़ाच्या भाषणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्य चांगल्या पद्धतीने चालवण्याचा निश्चितपणे आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत मत व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की,” राज ठाकरे यांचं पूर्ण भाषण मी ऐकू शकलो नाही. पण जेवढं काही ऐकलं त्यामध्ये ते काही महत्त्वपूर्ण मुद्दे बोलले आहेत. त्या मुद्द्यांवर निश्चितपणे आम्ही विचार करु. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.” असे मत फडणवीसांनी मांडले. तसेच “औरंगजेबाची कबर ही  ASI ची प्रोटेक्टेड कबर आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो किंवा न आवडो कायद्याने 50 वर्षापूर्वी त्याला संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याठिकाणी जो कायदा आहे त्या कायद्याचे पालन करणं ही जबाबदारी आहे. मात्र हे निश्चित आहे की, औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण आम्ही होऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच बघतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी महाराष्ट्रामधून असून त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांकडे इशारा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे मुळात काहीच कारण नाही. मोदी हे आमचे नेते आहेत. अजून पुढचे अनेक काळ ते काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की, 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडेच बघतो आहे. आमच्यासोबत पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीमध्ये वडील जीवंत असताना मुलांचा विचार होत नाही. करायचा देखील नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे. की वडील जीवंत असताना मुलाने अशाप्रकारचा विचार करायचा. त्यामुळे आता कोणचाही आणि कोणताही उत्तराधिकारी शोधणं ही वेळ आलेली नाही. असा प्रश्न देखील आता नाही. जोपर्यंत माझा विषय आहे. तर माझा याच्याशी संबंध देखील नाही,” असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजीनामा देण्यासाठी नागपूर दौऱ्यावर आले असल्याचा घणाघात केला होता. खासदार राऊत म्हणाले की, “संकेत स्पष्ट आहे, माहिती बाहेर येते सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे धोरण 75 वर्षीय झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्यांच्यामुळे सरसंघ चालकांनी त्यांना या त्यांच्या संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी ही चर्चा केली.  दहा-अकरा वर्षांनी जाऊन नागपुरात सरसंघचालक यांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाही इतक्या वर्षात कधीच गेले नाही – ईश्वराचा देखील मृत्यू झाला. राम गेले, कृष्ण देखील एका बाणाने पारध्याच्या लोक सोडून गेले. प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागते. देव असो या मनुष्य असो. नरेंद्र मोदी यांचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल,” असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.

Web Title: Devendra fadnavis press response on political heir of pm narendra modi from maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Aurangzeb Kabar
  • devendra fadnavis
  • MP Sanjay Raut
  • narendra modi

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
4

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.