पाऊस सरींनी उकाड्यापासून दिलासा (फोटो सौजन्य-X)
IMD Weather Update in Marathi: आज राज्यात हवामान बदलण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातही हलक्या पावसासह गडगडाट अपेक्षित आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याकडून नागरिकांना हवामानाबाबत सतर्क राहण्याचा आणि हवामानातील तीव्र बदलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत इशारा दिला जात आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तासांत हवामानात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्रीपर्यंत मुंबई आणि ठाणे मेट्रो शहरांमध्ये ढगाळ हवामान राहील असून सोमवारी सकाळी किंवा दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, परंतु वाहतुकीवर आणि रस्त्यांवर पाणी साचण्याचा परिणाम होऊ शकतो. विदर्भात मात्र परिस्थिती अधिक गंभीर असेल. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमानात अचानक घट होऊन गारपिटीचा धोका वाढला आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हवामानातील या बदलांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. विदर्भात पावसाळी हंगामामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असली तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. सध्या किनारपट्टी भागात कधीही पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या जिल्ह्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगाळ हवामानामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम, बागायतदार धास्तावले आहे. तसेच किनारपट्टी भागात ताशी ४० किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या किनारपट्टी भागात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान, एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे.