Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

सरला बेट येथील १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना थेट इशारा दिला. सरला बेटाला प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

  • By विवेक
Updated On: Aug 25, 2026 | 04:25 PM
'रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,' मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

'रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,' मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू, फडणवीसांचा इशारा
  • वादग्रस्त विधानांमुळे रामगिरी महाराजांविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल
  • सरला बेटाच्या विकासासाठी आराखडा तयार करून प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकसित करणार
 

अहिल्यानगर : आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणाऱ्या सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले असून “रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना आम्ही नेस्तनाबूत करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. सरला बेट येथील संत गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना धमकी देणाऱ्यांना थेट इशारा दिला.

“रामगिरी महाराजांना काही लोक धमक्या देतात. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू. येथील कोणाच्याही केसाला हात लावू देणार नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले. धर्माच्या नावावर कोणी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा सामना करण्यासाठी आपण पुढे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वादग्रस्त विधानांमुळे रामगिरी महाराज चर्चेत

रामगिरी महाराज यापूर्वी त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचनादरम्यान त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते.

Devendra Fadnavis: ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

तसेच ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही ते चर्चेत आले होते. राष्ट्रगीतामध्ये बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यांवरूनही राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

सरला बेटाचा विकास आराखडा तयार करणार

सरला बेटाच्या विकासाबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. सरला बेटाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करून त्यानुसार काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात सरला बेटाला प्रमुख तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा आणि हे ठिकाण आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र म्हणून विकसित व्हावे, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वारकरी संप्रदायाची १७९ वर्षांची परंपरा आजही अखंड सुरू असल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. हरिनामाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो आणि जात-पात विसरून भक्तीची परंपरा पुढे नेली जाते, असे त्यांनी सांगितले.

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी सरकारच्या विविध योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या उपक्रमासह शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, कार्यक्रमातील वातावरणात राजकीय आणि धार्मिक रंगही पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फुगडी खेळली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्यातही फुगडीचा खेळ रंगला. या प्रसंगाची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा झाली.

Web Title: Devendra fadnavis warning ramgiri maharaj threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • CM Devendra Fadnavis
  • ramgiri maharaj

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
1

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
2

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
3

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
4

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.