Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर आज महायुतीच्या समन्वय समितीची हायव्होल्टेज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीतील समन्वय, महामंडळांचे वाटप आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 24, 2026 | 04:36 PM
दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Follow Us
Follow Us:
  • ‘वर्षा’वर संध्याकाळी ७ वाजता महायुती समन्वय समितीची बैठक.
  • दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा
  • महामंडळांचे वाटप, स्थानिक समन्वय आणि विधान परिषद जागांवर चर्चा होण्याची शक्यता
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज (सोमवार, 24 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुख्य उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि आगामी काळातील राजकीय रणनीती आखण्याचा पार्श्वभूमीवर हि मिटिंग आयोजित करण्यात आले असल्याचे समजण्यात येत आहे. असे असले तरीही सूत्रांच्या मते, आज मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून दोनी राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांच्यात बैठक पार पडली असून त्यात या दोन्ही नेत्यांमध्ये सिलीनीकरणाची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यातच आता महायुती समन्वय समितीची बैठक पार पडणार असून या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महामंडळांच्या वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा

महायुतीच्या घटक पक्षांमध्ये गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे घटक पक्षांमध्ये ताळमेळ वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यासाठीच मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध शासकीय महामंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांचे वाटप, जिल्हास्तरीय नियोजन समित्या आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमधील पदवाटप यावरही निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rohit Pawar on Nagpur Event: ’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

विधान परिषद नियुक्त्यांवरही नजर

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या पाच जागांबाबत अंतिम निर्णय घेण्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला येऊ शकतो. याशिवाय महायुतीतील आमदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर करून आगामी काळात अधिक प्रभावी समन्वय कसा साधता येईल, यावरही चर्चा अपेक्षित आहे.

विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट भविष्यात एकत्र आल्यास महायुतीची समीकरणे कशी बदलतील, हा मुद्दा बैठकीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची बैठक केवळ प्रशासकीय समन्वयापुरती मर्यादित राहणार की आगामी राजकीय रणनीतीबाबतही मोठे निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut Slams Narendra Modi: चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

Web Title: Ahayuti coordination meeting varsha fadnavis eknath shinde sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
3

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
4

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.