धनंजय मुंडेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; 'या' प्रकरणी हायकोर्टाने दिला दणका
शिर्डी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी चिंतन शिबीर सुरु केले आहेत. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर होते. यामध्ये पहिल्या दिवशी नाराज नेते छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. तर दुसऱ्या दिवशी वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले नेते धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. धनंजय मुंडे यांना बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन पालकमंत्री पदाची संधी नाकारण्यात आली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहून अजित पवारांच्या पहाटेचा शपथवेळीचा पुनरुच्चार केला आहे.
बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाही. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये संबंध असल्याचे आरोप केले जात आहे. वाल्मीक कराडवर मोक्का लावण्यात आला असून बीडचे पालकमंत्री पद देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी नुकतंच जाहीरपणे भाषण केले. यावेळी त्यांनी बीडमध्ये सुरु असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणासह पहाटेच्या शपथविधीपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांच्या राजकीय भाष्याची सर्वत्र चर्चा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले धनंजय मुंडे?
शिर्डीमधील भाषणामध्ये पदाधिकाऱ्यांना संबोधताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, “मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा इत्यादींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. पण आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणी मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडून मला टार्गेट केलं जातंय. याचेच जास्त वाईट वाटत आहे,” अशी मनातील खदखद मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह महायुतीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही
पुढे धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची पुन्हा एकदा आठवण काढली आहे. अजित पवार यांनी महाविकास आघाडी तयार होण्यापूर्वी 2019 च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन जोरदार टीका देखील झाली होती. मात्र ही युती तेव्हा टिकली नाही. यावर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “2019 साली पहाटेची शपथ घेऊ नका, असे मी अजित पवार यांना सांगितले होते. सुनील तटकरे याचे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली. पण याची शिक्षा मात्र मला मिळाली,” असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.