धनंजय मुंडे यांच्यानंतर आता 'या' मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर वाढतोय दबाव
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देणार असल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेत आले आहे. आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबत संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. सत्ताधारी महायुतीमधील नेत्यांनी देखील ही मागणी केली होती. यानंतर आता धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विधीमंडळाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा देत असल्याचे मुंडेकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांनी लिहिले आहे की, “संतोष देशमुख यांचे मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. तरी या सरकारमध्ये कोणतीही करुणा दिसत नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत नाही. असे निर्दयी सरकार कसे काय असू शकते?” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आरोपींची राज्यामध्ये इतकी हिम्मत वाढली आहे याकी त्यांना वाटतं आमचं कोण काय करणार आहे? कोणाची औकात आहे. ही हिम्मत कुठून आली तर सत्ताधारी नेत्यांच्या आशिर्वादामुळे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचे आवाहन आहे की, अजून इतकी महाराष्ट्राची इज्जत घालवू नका. आपल्याला मोठे बहुमत आहे. आपण अशा मंत्र्यांना लाथ मारुन बाहेर काढा. आरोपींना मरेपर्यंत एवढे फटके मारले पाहिजे की राज्यामध्ये कोणी परत अशी हिम्मत करणारच नाही,” असे स्पष्ट मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाच्या आवारामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजीनामा दिला असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.