'येत्या पाच वर्षांत सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार'; प्रणिती शिंदे यांचे आश्वासन (Photo : Praniti Shinde)
पंढरपूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले होते. दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यासाठी वचनपूर्तीचे पहिले पाहून म्हणून येत्या पाच वर्षांत सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार असल्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
खासदार प्रणिती शिंदे या डोंगरगाव येथील साठवण तलावाच्या खोदाईच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी ईएफआय या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती सी, काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, अॅड रविकिरण कोळेकर, अॅड दत्तात्रय खडतरे यांच्या स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, येत्या पाच तारखेपासून सोलापूर जिल्हासह दुष्काळपट्ट्यातील मंगळवेढा तालुक्याच्या २४ गावातील सर्वच जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.’
हेदेखील वाचा : अखेर ठरलं ! ‘लाडक्या बहिणीं’ना फेब्रुवारीचा हफ्ता मिळणार याच महिन्यात; तारीखही समोर…
तसेच माझ्या प्रयत्नातून मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात चेन्नई येथील एन्वायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने अंतर्गत जलसंधारणाची कामे सुरू केले जाणार आहेत. पर्यावरणप्रेमी ऑफ इंडिया संवर्धन आणि अधिवास पुनर्संचयन संस्था आहे. जी देशातील १८ राज्यांमध्ये कार्यरत आहे.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळावर मात करण्यासाठी या संस्थेचे प्रमुख अरुण कृष्णमूर्ती सी. यांच्याशी चर्चा करून जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर या संस्थेच्या वतीने सर्वेक्षण करून वाफळे, लक्ष्मी दहिवडी आणि डोंगरगाव या गावातील जलसाठे दत्तक घेऊन त्यांचे पुनर्संचय करणार आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, अॅड. रविकिरण कोळेकर, शहाजहान पटेल यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
हेदेखील वाचा : बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, चवीसोबत आरोग्याला होतील अनेक फायदे