Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच नगरसेवकांची ही बैठक होणार आहे. त्यामुळे बैठकीत नगरसेवकांना कोणत्या सूचना दिल्या जातात, अंतर्गत मतभेदांवर काय चर्चा होते, निधी आणि सभागृहातील तक्रारींवर तोडगा काढला जातो का, याकडे लक्ष लागले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2026 | 01:45 PM
पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

Follow Us
Follow Us:

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आता मध्यस्थी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही नगरसेवकांनी थेट तक्रार केल्यानंतर मोहोळ यांच्याकडे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याची जबाबदारी सोपविल्याची चर्चा आहे. आज किंवा गुरुवारी (उद्या) ते पदाधिकारी, नगरसेवकांशी संवाद साधणार असल्याचे समजते. आठ महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेत एक हाती सत्ता मिळालेल्या भाजपमध्ये गटबाजी फोफावली आहे.

पक्षाच्या महापालिकेतील कारभारावरून अंतर्गत नाराजी दिसून येत आहे. महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद, समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. तसेच नगरसेवकही उघडपणे नाराजी व्यक्त करत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेतील धोरणात्मक निर्णय, निविदा प्रक्रिया आणि महापालिकेतील विविध कामकाजावरून काही नगरसेवकांनी आक्षेप घेतले आहेत. आपल्या प्रभागासाठी पुरेसा निधी मिळत नाही. सभागृहात आपली भूमिका मांडण्यासाठी पुरेशी संधी मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी नगरसेवक करत आहे.

Maratha Reservation : ‘एकही मागणी मान्य नाही’; जरांगे पाटलांचा सरकारवर घणाघात, भरत गोगावलेंनाही थेट इशारा

काही विषयांत पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अनधिकृत ओव्हरहेड केबलच्या प्रस्तावावरून स्पष्ट झाले आहे. अशावेळी मोहोळ यांच्याकडे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. मोहोळ यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत नगरसेवकांना महापालिकेचे कामकाज, सभागृहातील भूमिका, प्रशासनाशी समन्वय आणि नगरसेवक म्हणून प्रभावीपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही अपेक्षित पद्धतीने कारभार होत नसल्याची चर्चा सुरू असल्याने मोहोळ यांची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

महापालिकेच्या कारभाराबाबत भाजपच्या काही नगरसेवकांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मोहोळ यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बैठकीत काय कानमंत्र मिळणार?

गुरुवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच नगरसेवकांची ही बैठक होणार आहे. त्यामुळे बैठकीत नगरसेवकांना कोणत्या सूचना दिल्या जातात, अंतर्गत मतभेदांवर काय चर्चा होते, निधी आणि सभागृहातील तक्रारींवर तोडगा काढला जातो का, याकडे लक्ष लागले आहे. भाजपची एकहाती सत्ता, नगरसेवकांची वाढती नाराजी आणि पक्षांतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांची ही ‘नगरसेवकांची शाळा’ भाजपसाठी किती प्रभावी ठरते, याकडे पुणे शहर संघटनेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Differences among bjp office bearers in pune to be resolved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • murlidhar mohol
  • political news

संबंधित बातम्या

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
1

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका
3

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
4

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.