
संभाजीनगरमध्ये युतीचा पेच वाढला! (Photo Credit - X)
बैठकीतील चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे:
बैठकीत काही प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन जागा शिवसेना आणि दोन जागा भाजपने लढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर ज्या प्रभागांमध्ये एखाद्या पक्षाचे स्पष्ट प्राबल्य आहे, तेथे तीन जागा त्या पक्षाने लढवाव्यात, असा पर्याय चर्चेला आला. मागील निवडणुकांचे निकाल, स्थानिक पदाधिकाऱ्यांची पकड, कार्यकर्त्यांची ताकद आणि संभाव्य उमेदवारांची स्वीकारार्हता या सर्व बाबींचा तपशीलवार विचार करण्यात आला. काही प्रभागांवर दोन्ही पक्षांचा दावा असल्याने तेथे मतभेद तीव्र झाल्याचेही समोर आले.
बैठकीला उपस्थित प्रमुख नेते:
या बैठकीला भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर, शिरीष बोराळकर, प्रशांत देसरडा उपस्थित होते. तर शिवसेना (शिंदे गट) कडून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार किशनचंद तनवानी, माजी महापौर विकास जैन, ऋषिकेश जैस्वाल यांनी सहभाग घेतला. दोन्ही बाजूंकडून राजकीय ताकदीची आकडेवारी आणि स्थानिक समीकरणांची मांडणी केली.
मित्रपक्षाला कुठल्या जागा अपेक्षित
८८ या बैठकीत कोणत्या जागा कोण लढवणार, कोणत्या सोडणार आणि मित्रपक्षाला कुठल्या जागा अपेक्षित आहेत, यावर सविस्तर चर्चा झाली. आता या सर्व बाबी मित्रपक्ष त्यांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आणि आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवू. त्यानंतर पुन्हा चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. असे भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी म्हटले आहे.
मुलाखत पूर्ण !
भाजप आणि शिंदेसेनेने आपल्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. आता कोणाला कोट्या प्रभागातून उभे करायचे यावर दोन्ही पक्षात काथ्याकूट सुरु आहे. याच्या निर्णयाकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत.
मुंबईच्या आदेशाची प्रतीक्षा
भाजप आणि शिंदेसेनेने आपल्या इच्छुकांची यादी मुंबई ‘हायकमांड’कडे पाठवली आहे. मुंबईत यावर मंथन सुरु असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग, त्यात विजयी होणार अपेक्षित उमेदवार याची जुळवाजुळव केली जात आहे.