Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी कायम? विरोधी पक्षनेता ठरवण्यावरुन पटोले विरुद्ध ठाकरे

विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरुन मोठे राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीमध्ये या पदावरुन रस्सीखेच सुरु असून नाना पटोले विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 18, 2024 | 01:56 PM
Dispute between Nana Patole and Uddhav Thackeray over the post of Leader of Opposition

Dispute between Nana Patole and Uddhav Thackeray over the post of Leader of Opposition

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभेच्या निकालानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. महायुतीकडे एकतर्फी निकाल लागला असला तरी सत्तास्थापनेसाठी आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी विलंब झाला आहे. यामुळे महायुतीमध्ये देखील अनेक नेते नाराज आहेत. महायुतीसह आता महाविकास आघाडीमध्ये देखील नाराजीनाट्य सुरु असल्याचे चित्र आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कमीत कमी नेते देखील महाविकास आघाडीच्या कोणत्याच घटक पक्षाकडे नसल्यामुळे या पदाबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गटामध्ये विरोधी पक्षनेतेपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट आहे.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. काल (दि.17) शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले होते. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री झाल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन केले. निवडणुकीनंतर ही पहिलीच भेट असल्यामुळे अनेकांनी विविध तर्क वितर्क लावले त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. विरोधी पक्षनेते संदर्भात राहुल नार्वेकर निर्णय घेणार असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेते नाना पटोले हे आक्रमक झाले आहेत.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाकडे विरोधी पक्षनेतापद घेण्याऐवढे देखील जागा नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर व देवेंद्र फडणवीस यांना भेटून विरोधी पक्षपदाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे बोलले जात आहे. परस्पर भेट घेतल्यामुळे नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये नाराजीचा सूर उमटलेला दिसून येत आहे.

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शिवसेनेचा आकडा आमच्यापेक्षा मोठा आहे. त्यांचे २० आमदार आहेत, तर आमचे १६. त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येणारच. पण यावर एकत्र बसून चर्चा हईल, अशी अपेक्षा होतील. पण त्यांनी स्वंतत्र जाऊन चर्चा केली तर काही बोलणार नाही,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. यामुळे नाना पटोले यांना उद्धव ठाकरे यांची परस्पर भेट पटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे नाना पटोले म्हणाले की, “विरोधी पक्षनेतेपदाचा सर्व निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. यामुळे विरोधी पक्षनेतपदी नेमणूक करायची की नाही या सर्वस्वी अधिकार हा नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करून नार्वेकर पुढील निर्णय घेतील. उद्या अध्यक्षांनी ठरविल्यास विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकते. कारण राज्यात तसा पायंडा आहे,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

तर विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, “विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे असल्याने विधानसभेत ते काँग्रेसला मिळावे, असे त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत आहे. पण ठाकरे निर्णय का घेत नाहीत, याचे कोडे असून शपथविधी, विस्तार आणि खातेवाटपाला विलंब झाला. मग आम्ही थोडावेळ घेतला, तर बिघडले कुठे,” असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकर यांची घेतलेली भेट कॉंग्रेस नेत्यांना पटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Dispute between nana patole and uddhav thackeray over the post of leader of opposition of maharashtra vidhansabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 01:56 PM

Topics:  

  • Nana patole
  • Uddhav Thackeray
  • Winter Session

संबंधित बातम्या

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
1

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू
2

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
3

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय
4

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.