
मोठी बातमी ! महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग
मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. याचे निकालही हाती आले आहेत. त्यानंतर आता महापौरपदासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच आता मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज (दि.२२) आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
१६ जानेवारी रोजी २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर सत्ता स्थापनेचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण निश्चित होणे. मात्र, आरक्षणाची सोडत न निघाल्याने संबंधित महापालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया रखडली होती. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. सोडतीनंतर संबंधित महापालिका आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…
दरम्यान, चक्राकार पद्धतीनुसार यापूर्वीचे आरक्षण वगळून नवे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार असून, आरक्षणाचे प्रमाण २.९ या सूत्रानुसार ठरवले जाईल. यामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई, पुण्यासह नागपूरमध्येही आरक्षणाची सोडत
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २९ महापालिकांसाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
नव्या चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या सोडतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आता नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाण्याची जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुला प्रवर्ग यांचा समावेश असेल. जर जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब केला, तर यंदा मुंबईचे महापौरपद ‘अनुसूचित जमाती’ प्रवर्गासाठी जाण्याची शक्यता आहे.
अकोल्यात जय गेडाम यांचा विजय
अकोला महापालिकेच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका जया गेडाम यांची अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थिती जीवनाशी संघर्ष करत कसाबसा घरचा गाडा हकताना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. आणि अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून त्यांनी नगरसेवक म्हणून दणदणीत विजयही मिळवला आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत त्यांनी केलेला हा विजय नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हेदेखील वाचा : KDMC Politics: मनसेचा शिंदेंना पाठिंबा, राज ठाकरे नाराज? संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ निर्णयावर फोडला बॉम्ब