भाजप- उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा अंदाज (फोटो- सोशल मीडिया)
अकोला जिल्ह्यात भाजपने ठाकरेंना ऑफर दिल्याची चर्चा
29 पैकी जवळपास 25 ठिकाणी महायुतीचा विजय
ठाकरेंना ऑफर दिल्याने राजकारणात खळबळ
Akola News: राज्यातील नुकताच 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 29 पैकी जवळपास 25 महापालिकेत महायुतीचा विजय झाला आहे. दरम्यान विजय झाल्यानंतर आता सत्ता आणि महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अकोला जिल्ह्यात भाजपने ठाकरेंच्या पक्षाला ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे.
विविध ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरुद्ध लढलेले पक्ष देखील आता काही ठिकाणी एकत्रित येताना दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे.
अकोला जिल्ह्यात 80 जागांसाठी महानगरपालिका निवडणूक पर पडली. त्यामध्ये 38 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी कोंग्रेसला 1 जागा मिळाली आहे. तर ठाकरेंच्या पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत. तर अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 41 हा आकडा गाठण्याची गरज आहे.
41 जागांचे गणित जुळवण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या पक्षाला ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत भाजप- ठाकरेंच्या पक्षात बैठक झाल्याचे देखील म्हटले जात आहे. अकोला जिल्ह्यात कोणत्याच पक्षाला बहुमत प्राप्त झालेले नाही.
Maharashtra Politics: सत्तेसाठी काय पण? निवडणुकीत कट्टर विरोधक येणार एकत्र; इंदापूरचा विषय काय?
38 जागा जिंकलेल्या भाजपने ठाकरेंच्या पक्षाला ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंचे 6 आणि भाजपचे 38 असे एकत्रित नगरसेवक आल्यास महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली जाऊ शकते. ठाकरेंच्या पक्षाने उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद मागीतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप आणि ठाकरेंची शिवसेना अकोला जिल्ह्यात युती करणार का असा प्रश्न समोर येत आहे. तसेच सत्तेसाठी भाजप ठाकरेंच्या पक्षाला सोबत घेणार का असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
मनसेचा शिंदेंना पाठिंबा, राज ठाकरे नाराज?
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे की, कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय हा राज ठाकरे यांच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत आहे. राऊत म्हणाले, राज ठाकरे या निर्णयामुळे व्यथित आहेत. स्थानिक नेत्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा अन्य कारणांमुळे हा निर्णय घेतला असून, तो पक्षाच्या धोरणांच्या विरोधात आहे.
संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसच्या कारवाईचे उदाहरण देत मनसेवर निशाणा साधला. अंबरनाथमध्ये भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांवर काँग्रेसने जशी तात्काळ हकालपट्टीची कारवाई केली, तशीच कारवाई आता मनसेने आपल्या स्थानिक नेत्यांवर करायला हवी, असे राऊत यांनी सुचवले. पक्षाच्या मूळ भूमिकेला हरताळ फासणाऱ्या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, अशी अप्रत्यक्ष मागणी त्यांनी केली.






