Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जेव्हा विरोधक टीका करतात तेव्हा १४० कोटी जनता मोदीजींसोबत येते,” मोदींच्या आवाहनावरून शिंदेची विरोधकांवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले आहे. "जेव्हा विरोधक टीका करतात तेव्हा १४० कोटी जनता मोदीजींसोबत येते," अश्या शब्दांत त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.

  • By विवेक
Updated On: May 13, 2026 | 05:08 PM
Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Follow Us
Follow Us:
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद
  • केवळ सुरक्षेसंबंधी आवश्यक गाड्याचं एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात
  • राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द
Mumbai: इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलच्या कमी वापर करण्याच्या आवाहनावरून देशभरात चर्चाना उधाण आले आहे. विरोधकांनी या आवाहनावरून पंतप्रधानांवर चांगलीच टीकेची झोड उठवली. एकीकडे पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर विविध प्रतिक्रिया येत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले आहे. “जेव्हा विरोधक टीका करतात तेव्हा १४० कोटी जनता मोदीजींसोबत येते,” अश्या शब्दांत त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. “युद्धाचा फटका देशाला कमीत कमी बसला पाहिजे यासाठी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच प्रधानमंत्री मोदी यांनी आवाहन केले हवे. ज्या माध्यमातून इंधनाची बचत करता येईल ती आपण केली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देतोय,” असे ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी इंधन बचतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर सरकारी कामदेखील याचे पडसाद दिसू लागले आहेत. सरकारी खर्चामध्ये कपात करण्याच्या उद्देशाने, त्यांनी आपल्या अधिकृत ताफ्याचा (कॉन्व्हॉयचा) आकार निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटू लागल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. मंत्र्यांच्या ताफ्यातदेखील घट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अश्यातच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत याबाबत मोठे भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात होणार घट

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “माझ्या ताफ्यातील गाड्या मी कमी केल्या आहेत. यापुढे केवळ सुरक्षेसंबंधी आवश्यक गाड्याचं माझ्या ताफ्यात राहतील. मोदीजींनी जे आवाहन केले आहे ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिल पाहिजे. मोदीजींनी काटकसरीचं नियोजन सांगितलं आहे, त्याप्रमाणे पेट्रोल डिझेल याचा वापर कमी झाला पाहजे. क्रूड ऑइल आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो, त्यामुळे परकीय चलन जाते. म्हणून इंधन काटकसरीने वापरले पाहिजे. सर्व भारतीयांनी देशहितासाठी हे स्वीकारलं पाहिजे.”

Maharashtra Politics: राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येणार? फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला. या निर्णयामागे भारताच्या परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला दबाव हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे, अशातच आज मुख्यमंत्री फडणवीसांनी आज मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. राज्यातील सर्व मंत्र्यांचे ताफे अर्ध्यावर करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

प्रवीण दरेकरांचा इलेक्ट्रिक कारमधून प्रवासाचा निर्णय

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा दौरा रद्द केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले की, पंतप्रधानांनी देशहितासाठी चांगला निर्णय घेत जनतेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केलं आहे. प्रामुख्यांने ती आमचीही नैतिक जबाबदारी ठरते. मीसुद्धी इलेक्ट्रीक कारमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अध्यक्षांनी सांगितल्यानंतर जपानचा दौराही रद्द केला आहे.

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद

Web Title: Dycm eknath shinde slams oppn over pm narendra modis direction to nation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
1

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
2

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
3

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा
4

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.