Sandip Kshirsagar, Vijaysingh Pandit, NCP, Ajit Pawar,
आमदार विजयसिंह पंडित यांनी बीडमध्ये घेतलेल्या बैठकीनंतर हा वाद उफाळून आला. आमदार संदीप क्षीरसागर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहीत आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात होत असलेल्या बैठकीचे आमंत्रण न दिल्याने हक्कभंग दाखल करण्याचे नमूद केले आहे. यावेळी पंडित यांच्यावर आरॊप करत क्षीरसागर म्हणाले, “आमदार विजयसिंह पंडित यांचं बिडवरती खूप प्रेम उतू चाललं आहे, असं दाखवतात. मात्र बीड मधले उद्योग गेवराईला नेट आहेत. बीड MIDC, रेशीम उद्योग यांसारखे उद्योग गेवराईला नेत आहेत,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, “अजितदादा हयात असताना मांजरसुभ्याचा पण सर्वे करा असं मी म्हंटल होत. बॅकवॉटर योजनेसाठी सर्वच स्तरावर आम्ही पाठपुरावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजितदादांना दोनदा सभा घ्याव्या लागल्या. नगरपालिका निवडणुकीत जे काही केलं आहे ते अजितदादांनी केलं आजही. विकास काम असो कि भावनेचा विषय आम्ही अर्ध्या रस्त्यातून, चौकातून पळून जात नाही,” अश्या शब्दात त्यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर आगपाखड केली.
Maharashtra Politics: राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येणार? फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक
“हे बिडवरती प्रेम दाखवतात आणि सगळं गेवराईला घेऊन जातात. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. या मतदारसंघाने आम्हाला दोनदा आमदार केले आहे. त्यामुळे आम्हाला शहाणपणा शिकवू नका. आम्ही रोज रस्त्यावर फिरून काम करत आहोंत,” असं क्षीरसागर म्हणाले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र अजित पवारांच्या दुर्दवी मृत्यूनंतर याबाबत काही निष्पन्न झाले नाही. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे सांगितले. याबाबत संदीप क्षीरसागर यांना विचारले असता ते म्हणाले. “याबाबत मला काही माहिती नाही. मात्र अजितदादा हयात असताना त्यांच्यासोबत शेवटची भेट झाली असता ते म्हणाले होते कि आपण एकत्र येणार आहोत. पण त्यावर एवढं काही राजकारण सुरु आहे त्यामुळॆ त्यावर मी काही बोलणार नाही. योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय करतील,” असे ते म्हणाले.
Sunil Tatkare Sharad Pawar Meeting: शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!






