Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, पक्ष सोडलेल्या ‘त्या’ नेत्याला पद न देण्याची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतलेल्या आनंद परांजपे यांची नियुक्ती थांबवण्याची विनंती त्यांनी या पत्रातून केल्याचे समजते आहे.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 09:05 PM
DyCM Sunetra Pawar wrote letter to CM Devendra Fadnavis over not appointing Anand Paranjpe to MHADA chairmenship, DyCM Sunetra Pawar wrote letter to CM Devendra Fadnavis, Anand Paranjpe, MHADA,

DyCM Sunetra Pawar wrote letter to CM Devendra Fadnavis over not appointing Anand Paranjpe to MHADA chairmenship, DyCM Sunetra Pawar wrote letter to CM Devendra Fadnavis, Anand Paranjpe, MHADA,

Follow Us
Follow Us:
  • विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण गरम
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
  • शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतलेल्या आनंद परांजपे यांची नियुक्ती थांबवण्याची विनंती
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जागावाटपावरून महायुतीत सुरु असलेला तिढा सुटला नसून अद्याप कायम आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्येही काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी येत आहे. पक्ष सोडून गेलेल्या एका नेत्याला लक्ष्य करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतलेल्या आनंद परांजपे यांची नियुक्ती थांबवण्याची विनंती त्यांनी या पत्रातून केल्याचे समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करत आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी केली आय, असे सांगितले जात आहे. या पात्रात नमूद करण्यात दिल्यानुसार, आनंद परांजपे यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नये, त्याऐवजी आम्ही लवकरच दुसरे नाव सुचवू, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे समजत आहे. यामुळेच या पत्राबाबत आता सगळीकडे चर्चा होताना दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आनंद परांजपे हे नाव खूपच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या. काही दिवसांपूर्वी म्हणजेच १४ मे रोजी आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा तसेच पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. त्यानंतें त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आणि काहीच दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

Gopichand Padalkar: हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके सडलेल्या कांद्यासारखे आहे; भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर तोफ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्राद्वारे केलेल्या या मागणीवर आता मुख्यमंत्री फडणवीस काय ऍक्शन घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गट आणि आनंद परांजपे यांच्यादेखील यावर काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान आधीच विधान परिषदेच्या जागावाटपावरून नाराज असलेले महायुतीतील मित्रपक्ष आता काय भूमिका घेणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

“पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप,” हर्षवर्धन सकपाळ यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Web Title: Dycm sunetra pawar wrote letter to cm devendra fadnavis over not appointing anand paranjpe to mhada chairmenship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Anand Paranjape
  • devendra fadanvis
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
1

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
2

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी
3

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.