Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला

पंढरपूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर निशाणा साधला. तसेच डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात हिंसेचे समर्थन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 09:47 PM
'पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा'; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला

'पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा'; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला

Follow Us
Follow Us:
  • रामरक्षा आंदोलनावरून उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा हल्लाबोल
  • ‘पक्ष वाचवण्यासाठीच रामरक्षा’ असा उपमुख्यमंत्र्यांचा आरोप
  • डॉक्टर मारहाण प्रकरणात हिंसेला समर्थन नसल्याचे स्पष्ट
 

अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या रामरक्षा आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंढरपूर दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन हे “बेगडी प्रेम” असल्याचा आरोप केला.

उद्धव ठाकरेंकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी राज्यभर रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, ठाणे आणि नागपूरसह विविध शहरांमध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनातून मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असून रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचे आयोजन केले जात आहे.

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर; मुख्यमंत्र्यांकडे ठाण्यातील रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची करणार मागणी

पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा, एकनाथ शिंदेंचं टोला

याबाबत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “पूर्वी रामभक्तांवर टीका करणारे आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारे लोक आज रामरक्षा आंदोलन करत आहेत. त्यामुळे हे आंदोलन श्रद्धेपेक्षा राजकीय गरजेतून होत असल्याचा दावा त्यांनी केला. “आता पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा म्हणावी लागत आहे,” असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

डॉक्टर मारहाण प्रकरणावर मोठे भाष्य

दरम्यान, पंढरपूर दौऱ्यात शिंदे यांनी अन्य विषयांवरही प्रतिक्रिया दिली. डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण झाल्याच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत हिंसेचा निषेध केला. डॉक्टरांवर हल्ला करण्याचे समर्थन आपण कधीच केले नाही आणि भविष्यातही करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

या प्रकरणात संबंधितांवर आवश्यक ती कारवाई सुरू असून खासदार श्रीकांत शिंदे यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कायद्यापुढे सर्व समान असून अशा घटनांबाबत सरकारची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

रामरक्षा आंदोलनावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. आगामी काळात हा मुद्दा आणखी राजकीय रंग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दोन्ही बाजूंनी परस्परांवर सुरू असलेली टीका अधिक धारदार होताना दिसत आहे.

Web Title: Eknath shinde criticizes uddhav thackeray ramraksha andolan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर; मुख्यमंत्र्यांकडे ठाण्यातील रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची करणार मागणी
1

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर; मुख्यमंत्र्यांकडे ठाण्यातील रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची करणार मागणी

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन
2

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा
3

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

Aaditya Thackeray: ‘आम्हाला कापले तरी भाजपसमोर…’, आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन; थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
4

Aaditya Thackeray: ‘आम्हाला कापले तरी भाजपसमोर…’, आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन; थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.