Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray: ‘आम्हाला कापले तरी भाजपसमोर…’, आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन; थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

सोनम वांगचुक यांच्या लडाख आंदोलनाच्या समर्थनासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत जाहीर आंदोलन केले. यावेळी आदित्य ठाकरेंनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसह थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपवर घणाघाती आरोप केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 19, 2026 | 06:45 PM
आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन; थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी (Photo Credit- X)

आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन; थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘आम्हाला कापले तरी भाजपसमोर…’
  • आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन
  • थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई: लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईत जाहीर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बोलताना युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपच्या धोरणांवर आणि देशातील सद्यस्थितीवर जोरदार हल्लाबोल केला. “आम्हाला कापले तरी आम्ही भाजपसमोर कधीही झुकणार नाही,” असा आक्रमक निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आधी शिक्षणमंत्र्यांचा, मग थेट पंतप्रधानांचा राजीनामा मागणार

आदित्य ठाकरे यांनी परीक्षांमधील गोंधळ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “देशातल्या तरुण आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आज मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत. महाराष्ट्राचा अभिजित दिपके हा तरुण सध्या दिल्लीत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसला आहे. आम्ही सध्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. पण ही तर केवळ सुरुवात आहे; पुढे जाऊन आम्ही थेट या देशाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत.”

लडाखची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव: आदित्य ठाकरे

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी लडाखला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी नेहमीच शांततापूर्ण मार्गाने लढा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने लडाखच्या जनतेला तसे आश्वासनही दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर भाजपने लडाखच्या जनतेची फसवणूक केली. भाजपला लडाखची मौल्यवान जमीन उद्योगपती अदानी यांच्या घशात घालायची आहे आणि याच कारणामुळे वांगचुक यांच्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

‘धर्मेंद्र प्रधान नव्हे, आता सरकारच बदलायचं’; सोनम वांगचुक आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

तरुणांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाती-धर्माचे राजकारण

केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील जनतेने भाजपला देश बदलण्यासाठी आणि विकासासाठी बहुमत दिले होते. मात्र, हे लोक आता देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. ‘हर घर जल’, ‘स्मार्ट सिटी’, ‘प्रत्येकाला घर’ या भाजपच्या जुन्या घोषणा आता कुठे गायब झाल्या आहेत? असा सवाल त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले, “भाजप सरकार तरुणांच्या रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जनतेला धर्म आणि जातीच्या वादात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. जग पुढे जात असताना भाजप आपल्याला ५० वर्षांपूर्वी काय झाले, यात अडकवून नेहरू विरुद्ध सरदार पटेल असा भूतकाळातील वाद उकरून काढत आहे.”

पुढील १० वर्षांत बेरोजगारीचा विस्फोट होणार

देशातील बेरोजगारीच्या भीषण परिस्थितीवर बोट ठेवताना त्यांनी एका अहवालाचा दाखला दिला. “पुढच्या १० वर्षांत देशात १२० कोटी तरुणांना नोकऱ्यांची गरज भासणार आहे, मात्र सरकार केवळ ४० कोटी तरुणांनाच नोकऱ्या देऊ शकणार अशी स्थिती आहे. भाजपच्या नेत्यांची मुले परदेशात शिकायला आणि स्थायिक व्हायला जातील; मग आपल्या सर्वसामान्य मराठी आणि भारतीय तरुणांनी कुठे जायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. या जनविरोधी सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी आता देशात ‘आधी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि नंतर थेट प्रधानमंत्र्यांचा राजीनामा’ हा एकच नारा घुमणार, असा इशारा देत आदित्य ठाकरेंनी भाषणाचा समारोप केला.

Uddhav Thackeray Protest : उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा! आंदोलनावरून ठाकरे विरुद्ध सदावर्ते वाद

Web Title: Aaditya thackeray leads protest in mumbai supporting sonam wangchuk demands pm resignation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Maharashtra Politics
  • Shivaji Park
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
1

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
4

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.