Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना

राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून कोकणातील विधान परिषद मतदारसंघावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी ४ जून पर्यंत मागे घेऊ नयेत' अश्या सूचना केल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: May 31, 2026 | 09:34 PM
Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Follow Us
Follow Us:

राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून कोकणातील विधान परिषद मतदारसंघावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीच्या जागावाटपात कोकण मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली होती. अनिकेत तटकरे या जागेवरून अर्ज देखील दाखल करणार असल्याचे निश्चित झाले आहे. अश्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातल्या आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत युतीधर्म पाळण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. आता मात्र यात नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून ‘ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी ४ जून पर्यंत मागे घेऊ नयेत’ अश्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

एकीकडे तातडीची बैठक घेत युतीधर्म पाळण्याचे आवाहन आणि त्याच बैठकीत भरलेले उमेदवारी अर्ज मागे न घेण्याबाबतच्या सूचना यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण मतदारसंघाबाबत शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरु राहणार असल्याचे समजते. कोकणच्या विधान परिषद उमेदवारीसाठी अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाले असून ते उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार असल्याचे समजत आहे. यावरून महायुतीत कोकणातील इतर नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लग्नल्या. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवत ‘शिवसेनेच्या आमदारांनी युतीधर्म पाळावा.’ अश्या सूचना दिल्या.

नेमकं काय घडलं?

कोकणच्या जागेवरून उद्भवलेल्या वादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा अर्ज दाखल करण्यास शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निलेश राणे आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित होते. कोकणची जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे शिवसेना आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संयम पाळावा अश्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. विधान परिषदेची कोकणातील जागा हि अनिकेत तटकरे हे लढवणार असल्याचे निश्चित समजले जात होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी ‘ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी ४ जून पर्यंत मागे घेऊ नयेत’ अश्या सूचना दिल्यामुळे महायुतीत नक्की काय घडतंय असा प्रश उपस्थित केला जात आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधानपरिषद मतदारसंघात शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे हि जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही होते. मंत्री भारत गोगावले यांनी या मतदारसंघासाठी त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. तसेच, आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे आता त्यांनी दाखल केलेले अर्ज ४ जूनपर्यंत मागे न घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला ! भाजपला सर्वाधिक ११ जागा तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नशिबात फक्त ‘इतक्याच’ जागा…

या जागावाटपात भाजपला सर्वाधिक अकरा जागा, शिवसेना शिंदे गटाला चार जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांवर असून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर राष्ट्रवादिला मात्र अतिरिक्त एक जागा पदरात पडून घेण्यास यश मिळाले आहे. यात कोकण विभागाची एक जागा समाविष्ट आहे. म्हणूनच अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीवरून त्यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. सोमवारी (१ जून) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधीच अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

“फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड,” विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

Web Title: Eknath shinde instructed shivsena leaders not to withdraw application of kokan vidhan parishad candidature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
1

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
2

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट
3

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
4

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.