Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुंगी गुडिया’ वादावर एकनाथ शिंदे संतापले; काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी

काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमधील 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत सुनेत्रा पवार यांची माफी मागण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 08:31 PM
Eknath shinde

Eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • ‘गुंगी गुडिया’ उल्लेखावरून राजकीय वाद अधिकच तीव्र
  • एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका, माफीची मागणी
  • अर्थखात्याच्या मुद्द्यावरही शिंदेंचे सपकाळांना प्रत्युत्तर
 

महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्यावरील ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून निर्माण झालेला वाद आणखी तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवार यांच्याबाबत हा उल्लेख करण्यात आला होता. तसेच बीडमधील एका पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने टीका केली होती. या पोस्टनंतर महायुतीतील नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल सुरू केला असून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, जनतेने काँग्रेसला आधीच त्यांची जागा दाखवली असून अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा अधिकच खराब होत आहे. सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेला उल्लेख हा एका महिलेचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला आणि काँग्रेसने याबद्दल सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी केली.

या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भात वापरल्याचे सांगितले होते. तसेच अर्थखात्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सुनेत्रा पवार यांनी आपल्या कामातून उत्तर द्यावे, असेही म्हटले होते.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा निर्णय! सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द; आता फक्त ‘हे’ दोनच अधिकृत चेहरे

काँग्रेसची भूमिका दुर्दैवी – उपमुख्यमंत्री शिंदे

यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अर्थखाते किंवा अन्य प्रशासकीय निर्णय हा सरकारचा विषय आहे आणि मुख्यमंत्री तसेच सरकार त्याबाबत निर्णय घेण्यास सक्षम आहे. मात्र, अशा राजकीय मुद्द्यांच्या नावाखाली एका महिला लोकप्रतिनिधीचा अवमान करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसची भूमिका दुर्दैवी असून अशा भाषेचा वापर टाळायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधींवर नाव न घेता टीका

शिंदे यांनी पुढे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावरही टीका करत, पक्षातील काही नेते परदेशात जाऊन देश आणि पंतप्रधानांविषयी वक्तव्य करतात, असा आरोप केला. आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरून काँग्रेसने महिलांचा सन्मान राखला नसल्याचा दावा त्यांनी केला.

‘गुंगी गुडिया’ वादावर हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; टीकेचे समर्थन करत सुनेत्रा पवारांना दिला मोलाचा सल्ला

दरम्यान, या प्रकरणामुळे महायुती आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसकडून या नव्या प्रतिक्रियेला काय उत्तर दिले जाते आणि हा वाद पुढे कोणते राजकीय वळण घेतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Eknath shinde reacts sunetra pawar gungi gudiya row congress apology demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • NCP Party
  • shivsena
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
1

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
2

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
3

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
4

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.