Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुनावणीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतही माहिती दिली.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 06:11 PM
Eknath Shinde

Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • ‘जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली’ म्हणत ठाकरे गटावर शिंदेंची टीका
  • जनतेने 60 आमदार निवडून कौल दिल्याचा दावा
  • पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर संसदेतील विरोधकांवरही निशाणा
 

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हासंदर्भातील सुनावणी सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा उल्लेख करत विरोधकांनी पूर्वी केलेल्या आरोपांची पुनरावृत्ती केल्याचा दावा केला.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर निशाणा साधत, “न्यायालयावर त्यांचा विश्वास आहे की नाही हे एकदा त्यांनी ठरवले पाहिजे,” असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “यापूर्वी सुनावणीवेळी ते पेढे वाटत होते. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, असे बोलत होते. परंतु महायुतीचे सरकार कायद्याच्या चौकटीत स्थापन केले होते. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही सरकार घटनाबाह्य नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे जी कॅसेट ते वाजवत होते तीच त्यांनी आज पुन्हा वाजवली,” अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

“त्या सरकारचा आणि आमदारांचाही कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करणारे कुठल्या काळात वावरतात,” असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. “जनतेच्या न्यायालयात न्याय मागू, असे सांगणाऱ्यांना जनतेने निवडणुकांमध्ये जागा दाखवली. जनतेने आम्हाला स्वीकारले. शिवसेनेचे ४० आमदार होते ते ६० झाले. आम्ही लोकशाही मानणारे आहोत.आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे फार बोलणार नाही,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पंतप्रधान मोदींची दिल्लीत घेतली भेट

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार ज्योती वाघमारे, खासदार संजय दिना पाटील यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या खासदारांना पंतप्रधानांनी सकाळी चहापानासाठी बोलवले होते. यावेळी काळजी करु नका, मतदार संघातील विकास कामांवर लक्ष द्या, अशी ग्वाही पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांनी दिली.

विरोधकांवर साधला निशाणा

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “सरकार संसदेत चर्चेसाठी तयार असताना विरोधक मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनाम्यासाठी संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहेत. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असताना काँग्रेसने मात्र षडयंत्र रचत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवासस्थानी निदर्शने केली. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.”

‘ठाणे कि रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते मग जरांगेची भाषा मान्य आहे का?’ गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

“ज्यांचे आंदोलन होते ते संपले आणि विद्यार्थी आपआपल्या कामात व्यस्त होते. विद्यार्थी आणि युवा हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. त्यांचा सन्मान ठेवून पंतप्रधानांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यांनी युवकांशी संवाद देखील साधला, मात्र काँग्रेस व इतर विरोधक गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेसला संसदेत चर्चेसाठी यायचे नाही पण संसदेबाहेर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी निव्वळ राजकारण करायचे आहे,” अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Web Title: Eknath shinde targets thackeray group over shiv sena symbol hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
1

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
2

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
3

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
4

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.