Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती नगरपालिका निवडणुकीत येणार रंगत; माजी नगराध्यक्ष सुनिल पोटेंनी मुलाला सोडून जितेंद्र गुजर यांना दिले समर्थन

प्रभाग क्रमांक 15 कडे बारामतीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण या प्रभागात माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2025 | 08:01 AM
बारामती नगरपालिका निवडणुकीत येणार रंगत; माजी नगराध्यक्ष सुनिल पोटेंनी मुलाला सोडून जितेंद्र गुजर यांना दिले समर्थन

बारामती नगरपालिका निवडणुकीत येणार रंगत; माजी नगराध्यक्ष सुनिल पोटेंनी मुलाला सोडून जितेंद्र गुजर यांना दिले समर्थन

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती नगरपालिका निवडणुकीत आता रंगत येणार आहे. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र गुजर यांना माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांनी थेट समर्थन देत आपला मुलगा यशपालच्या पाठीशी नाही तर जितेंद्र गुजर यांच्या पाठीशी आहोत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीर केली.

माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे हे प्रभाग क्रमांक १५ मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी पॅनलचे उमेदवार मंगल किर्वे व जितेंद्र गुजर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी भिगवन चौक येथे करण्यात आला. तेली पंच मारुती मंदिर व सिद्धी गणेश मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे, सुभाष सोमानी, जय पाटील, अभिजीत काळे, ऋतुराज काळे, बिरजू मांढरे, अभिजीत चव्हाण, नितीन बागल, जितेंद्र गुजर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या जितेंद्र गुजर संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हेदेखील वाचा : Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने

दरम्यान, प्रभाग क्रमांक 15 कडे बारामतीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण या प्रभागात माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच सुनील पोटे यांनी तेली पंच मारुती मंदिर येथे तेली समाजातील बांधवांची विशेष बैठक आयोजित केली.

जितेंद्र गुजर यांच्या बाजूने, प्रचारासाठी कार्यरत राहणार

या बैठकीत बोलताना सुनील पोटे म्हणाले, ‘अजितदादांनी माझ्या शब्दाखातर माझी बहीण मंगल किर्वे यांना उमेदवारी दिली आहे. मी त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. यशपालला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकत नाही. त्यामुळे मी या निवडणुकीत जितेंद्र गुजर यांच्या बाजूने असून, त्यांच्या प्रचारासाठी कार्यरत राहणार आहे. तुम्हीही यशपालच्या पाठिशी उभे राहू नका’, असे आवाहन उपस्थितांना केले.

अजितदादांनी माझा शब्द पाळला

‘अजितदादांनी माझा शब्द पाळला आहे. आपण त्यांचा शब्द डावलू नये. सर्वांनी एकजुटीने उभे राहून जितेंद्र गुजर यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया’.

– सुनिल पोटे, माजी नगराध्यक्ष.

Web Title: Former mayor sunil pote supported jitendra gujar in baramati municipality elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • baramati news

संबंधित बातम्या

Rohit Pawar Criticized CID: ४ महिन्यांनंतरही ठोस माहिती नाही; रोहित पवारांची ‘CIDच्या संथ कारभारावर जोरदार टीका
1

Rohit Pawar Criticized CID: ४ महिन्यांनंतरही ठोस माहिती नाही; रोहित पवारांची ‘CIDच्या संथ कारभारावर जोरदार टीका

बारामती बसस्थानकाचा राज्यात डंका! ‘अ’ वर्गात प्रथम क्रमांक, मिळाले १ कोटींचे पारितोषिक
2

बारामती बसस्थानकाचा राज्यात डंका! ‘अ’ वर्गात प्रथम क्रमांक, मिळाले १ कोटींचे पारितोषिक

Indapur Politics: ‘धरणाला भोक पाडणारेच आता निस्ताराचे बोल करतायत’; गारटकर-माने यांचा आजी-माजी मंत्र्यांवर घणाघात
3

Indapur Politics: ‘धरणाला भोक पाडणारेच आता निस्ताराचे बोल करतायत’; गारटकर-माने यांचा आजी-माजी मंत्र्यांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.