पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने
भूमिकेला सक्रिय पाठिंबा दिला: इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाविरुद्ध दंड थोपटत कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत कृषी मत्री दत्तात्रय भरणे यांना आव्हान दिले आहे, या निवडणुकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले प्रवीण माने यांनी देखील गारटकर यांच्या भूमिकेला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव
सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय जगताप यांनी देखील आपले वर्चस्व राखण्यासाठी जोरदार तयारी करत आता सासवड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा अडकवण्याचा निर्धार व्यक्त करत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या मातोश्री आनंदीकाकी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्याचबरोबर इतर सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणी विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी जगताप यांना शह देण्याची तयारी करत नगराध्यक्ष पदासाठी सचिन भोंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जेजुरी नगर परिषदेची निवडणूक देखील चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. एकंदरीत वरील सर्व नगरपरिषदेच्या निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे दिसून येत असले तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जात आहे. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा झेंडा आता नव्याने फडकवण्याची जोरदार तयारी केली आहे. तर विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी देखील थोपटेंचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे ही निवडणूक देखील चुरशीची होणार आहे.
दौंड मध्ये भाजप व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या नागरी हित संरक्षण समितीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवली जात असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शरद पवार गट यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक देखील लक्षवेधी होणार असून या ठिकाणी अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्या गटाला बरोबर घेत अजित पवार यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.






