BMC Election 2026: भाजप-शिंदेसेना की ठाकरे बंधू.., मुंबईकरांचा कल कुणाकडे? सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
Mayor of Mumbai : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर AsceIndia या संस्थेने मुंबई महापालिका निवडणुकांसाठी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मुंबईतील जवळपास निम्मे मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, एकूण निकाल पाहता मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचीच सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार अमराठी मतदार मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिंदे गटाला मतदान करतील, असा कयास आहे. AsceIndia चे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी ठाकरे बंधूंना मुंबईत माफक यश मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
तिवारी यांच्या मते, 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 55 टक्के होती आणि यंदाही मतदान जवळपास याच टक्केवारीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व्हेनुसार मुंबईत भाजप-शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना किती जागा मिळतात आणि ते मुंबईत आपले अस्तित्व कितपत टिकवू शकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (BJP Politics)
“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर AsceIndia संस्थेने जाहीर केलेल्या सर्व्हेमध्ये विविध समाजगटांमधील मतदानाचा कल स्पष्ट झाला आहे. मराठी, मुस्लीम आणि अमराठी मतदारांच्या पसंतीनुसार पक्षांना मिळणाऱ्या टक्केवारीचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
मराठी मतदारांमध्ये ठाकरे गट–मनसे आघाडीला 44 टक्के मतं मिळण्याचा अंदाज असून भाजप–शिवसेना युतीला 42 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 4 टक्के, तर इतर पक्षांना 11 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
मुस्लीम मतदारांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून तिला 41 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. ठाकरे गट–मनसेला 28 टक्के, भाजप–शिवसेनेला 11 टक्के, तर इतर पक्षांना 20 टक्के मते मिळू शकतात.
अमराठी मतदारांमध्ये भाजप–शिवसेना युतीला मोठा कौल मिळताना दिसत असून 53 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 19 टक्के, ठाकरे गट–मनसेला 15 टक्के आणि इतर पक्षांना 13 टक्के मते मिळू शकतात.
या आकडेवारीनुसार मराठी मतदारांमध्ये चुरशीची लढत असली तरी अमराठी मतदारांचा कौल भाजप–शिवसेनेच्या बाजूने अधिक झुकलेला असल्याचे चित्र समोर येत आहे.






