Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुती आणि महाविकास आघाडीत होणार तुल्यबळ लढत, कोणत्या जागेवर महायुतीचा कोण उमेदवार लढणार? जाणून घ्या…

विधान परिषद निवडणुकीवरून राज्यात आता वारे वेगाने वाहू लागले आहेत. आज (सोमवार, १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 04:59 PM
Full Candidate list of Mahayuti for Vidhan Parishad Election 2026,

Full Candidate list of Mahayuti for Vidhan Parishad Election 2026,

Follow Us
Follow Us:

विधान परिषद निवडणुकीवरून राज्यात आता वारे वेगाने वाहू लागले आहेत. आज (सोमवार, १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या एकूण १७ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार उतरवले गेले असून अजूनही काही जागांवर उमेदवार निवडीवरून संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

महायुती तसेच महाविकास आघाडीत जागावाटपावरून अनेक चर्चा आणि बैठकी पार पडल्या. शेवटी आधी महाविकास आघाडीत जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर महायुतीतही जागावाटपावरून एकमत झाले. महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक आठ जागा, शिवसेना ठाकरे गटाला सहा जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. महायुती मध्येदेखील अनेक चर्चांनंतर जागावाटपात एकमत ठरले आहे. महायुतीत या जागावाटपात भाजपला सर्वाधिक अकरा जागा, शिवसेना शिंदे गटाला चार जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर राष्ट्रवादिला मात्र अतिरिक्त एक जागा पदरात पडून घेण्यास यश मिळाले आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनेही आपल्या आठ जागांवरील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर तीन जागांवरील उमेदवारांची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.

विधान परिषदेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर

भाजप
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली – अरुण लखानी
भंडारा – गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – प्रवीण पोटे
सोलापूर – राजेंद्र राऊत
सांगली- सातारा – धैर्यशील कदम
अहिल्यानंगर – प्राजक्त तनपुरे
छ. संभाजीनगर – जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव – बीड – लातूर – बसवराज पाटील
जळगाव – नंदकिशोर महाजन
नागपूर – राजीव पोतदार

शिवसेना
ठाणे – रवींद्र फाटक
नाशिक – नरेंद्र दराडे
परभणी – हिंगोली – सईद खान
यवतमाळ – दुष्यन्त चतुर्वेदी

राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे
पुणे – विक्रम काकडे

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ! काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा, ठाकरे गट, शरद पवार गटाला फक्त ‘इतक्याच’ जागा…

असा असेल विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला ! भाजपला सर्वाधिक ११ जागा तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नशिबात फक्त ‘इतक्याच’ जागा…

Web Title: Full candidate list of mahayuti for vidhan parishad election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Mahayuti
  • vidhanparishad election 2024

संबंधित बातम्या

Gokul Election: गोकुळ निवडणुकीत महायुतीचा दावा; ‘२५-०’ मतांनी सत्ता मिळवणार
1

Gokul Election: गोकुळ निवडणुकीत महायुतीचा दावा; ‘२५-०’ मतांनी सत्ता मिळवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.