Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अण्णा हजारेंच्या आंदोलना आडून भाजपा-आरएसएसचा अजेंडा..,’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि नीट पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे राजकीय अजेंडा असल्याच्या विधानाचा समाचार घेत त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 05:52 PM
'अण्णा हजारेंच्या आंदोलना आडून भाजपा-आरएसएसचा अजेंडा चालवणाऱ्यांनाच..,' हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

'अण्णा हजारेंच्या आंदोलना आडून भाजपा-आरएसएसचा अजेंडा चालवणाऱ्यांनाच..,' हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

दिल्लीतील नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून राज्यातील राजकारण अधिक तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनामध्ये काही राजकीय पक्ष आणि इतर घटक स्वतःचा अजेंडा राबवत असल्याचे विधान केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

“नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २०१४ साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून फडणवीस यांच्या भाजपा व आरएसएसने अजेंडा चालवून देशात अराजक माजवण्याचे काम केले होते, अशा प्रवृत्तींना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडाच दिसू शकतो,” असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्याचे पडसाद! वंचित बहुजन आघाडीचा ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंद’ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

“देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना तारतम्य बाळगावे”

भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, पण जे लोक संविधानच मानत नाहीत त्यांना आंदोलनाचे महत्व कळणार नाही.”

“शेतकरी आंदोलकांना खलिस्तानी, नक्षलवादी,आंदोलनजीवी म्हणून त्यांची बदनामी करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून फडणविसांपर्यंत भाजपची संपूर्ण पिलावळ कार्यरत होती. सरकारला प्रश्न विचारला की त्यांना देशद्रोही ठरवण्याचा अजेंडा भाजपाचा आहे. जनतेला उत्तर देण्याची धमक भाजपा सरकारमध्ये नाही. फडणविसांचा दिल्लीतील आका तर स्वतःला हुकूमशाहच समजतो, त्यामुळे चर्चा, संवाद ही लोकशाही मुल्ये कधीच इतिहास जमा झाली आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना थोडे तारतम्य बाळगावे.

“अमानुष लाठी हल्ल्याचे समर्थन देवेंद्र फडणवीस करत आहेत का?”

दिल्लीत विद्यार्थ्यांना जनावरासारखी मारहाण करण्यात आली. १४-१५ वर्षांच्या विद्यार्थांनाही मोदी-शाहच्या पोलिसांनी सोडले नाही. मुलींचे कपडे फाडले, त्यांना अश्लील शिवीगाळ केली. या अमानुष लाठी हल्ल्याचे समर्थन देवेंद्र फडणवीस करत आहेत का? अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, हे फडणवीस यांचे दुसरे हास्यास्पद व बेजबाबदार विधान आहे. सरकारला परिस्थिती हाताळता येत नाही, कारण मोदी सरकारला लोकशाही मार्गाने सरकार चालवायचेच नाही.”

‘जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल’; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा

“काँग्रेस सरकार असताना आंदोलकांशी चर्चा केली जात होती, मंत्र्यांचे राजीनामेही घेतले जात होते, हे फडणवीस यांना माहित नाही असे नाही. नीट पेपर फुटीचे प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वात आधी हाती घेतले व त्यासाठी ‘छात्रों की गुंज’ हे अभियान देशभर सुरु केले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आडून नाही, तर थेट रस्त्यावर उतरून काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारला आहे व यापुढेही विचारत राहू,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनावले.

Web Title: Harshvardhan sapkal slams devendra fadnavis on neet student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • CJP Protest
  • CM Devendra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्याचे पडसाद! वंचित बहुजन आघाडीचा ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंद’ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्याचे पडसाद! वंचित बहुजन आघाडीचा ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंद’ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
2

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

“जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते”; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप, फडणवीसांवरही साधला निशाणा
3

“जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते”; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप, फडणवीसांवरही साधला निशाणा

तणाव वाढला! थेट PM हाऊसबाहेर राहुल आणि प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
4

तणाव वाढला! थेट PM हाऊसबाहेर राहुल आणि प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.