Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Harshvardhan Sapkal : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत महाराष्ट्र दौऱ्यावर इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 07, 2026 | 06:49 PM
Harshvardhan sapkal on Gyanesh Kumar

Harshvardhan sapkal on Gyanesh Kumar

Follow Us
Follow Us:
  • ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
  • SIR आणि मतदार यादीवरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
  • ज्ञानेश कुमार यांचा ७-८ ऑक्टोबरचा छत्तीसगड दौरा ‘अपरिहार्य कारणांमुळे’ स्थगित
 

Harshvardhan Sapkal : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आता चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत महाराष्ट्रात आल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना पाय ठेवू देणार नाहीत. आला तर त्याच्या तोंडाला काळं फासू,’ असा इशारा सपकाळ यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

‘ज्ञानेश कुमार भाजपच्या एजंटप्रमाणे वागत आहेत’

हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त संविधानिक पदावर असूनही भाजपच्या एजंटप्रमाणे काम करत आहेत.

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

काँग्रेसकडून मतदार यादीतील बदल, SIR (Special Intensive Revision) आणि मतदारांच्या हक्कांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने याच मुद्द्यांवर देशभर आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

‘देशभरातून राजीनाम्याची मागणी’

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरातून होत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा ७ आणि ८ ऑक्टोबरचा छत्तीसगड दौरा स्थगित करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दौरा ‘अपरिहार्य कारणांमुळे’ पुढे ढकलल्याचं सांगितलं असून नवीन तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

‘फॉर्म ६ मध्ये बेकायदा बदल केल्याचा आरोप’

हर्षवर्धन सपकाळ यांनी फॉर्म ६ मध्ये बेकायदा बदल करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेसने मतदारांच्या हक्कांसाठी आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवर विरोधकांकडून आक्षेप घेतले जात असताना आयोगाकडून मतदार यादीतील पुनरावलोकनाची प्रक्रिया आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसची आक्रमक भूमिका

मुंबईसह महाराष्ट्रातही ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील राजकीय आंदोलनाला वेग आला आहे. याआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.

आता हर्षवर्धन सपका यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. ज्ञानेश कुमार आणि निवडणूक अयोग्य यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस विरुद्ध सत्ताधारी भाजप यांच्यातील संघर्ष आणखीन पेटण्याच्या संभावना आहेत.

Jantar Mantar Protest: दिल्लीत जमावबंदी लागू, जंतर मंतरला छावणीचे स्वरूप सुरक्षा वाढवली, ज्ञानेश कुमारांविरोधात वातावरण पेटणार

Web Title: Harshvardhan sapkal warning gyanesh kumar maharashtra vote chori congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Congress
  • Gyanesh Kumar
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
1

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
2

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन
3

CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन

Rahul Gandhi Detained : दिल्लीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; 8 तासांच्या ठिय्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात
4

Rahul Gandhi Detained : दिल्लीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; 8 तासांच्या ठिय्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.