Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध

जानेवारी महिन्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु आहे. असे असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2026 | 11:17 AM
तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे 'दीप' आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट

तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे 'दीप' आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट

Follow Us
Follow Us:

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु आहे. असे असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचे ते म्हणाले. निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पुढील चार-पाच दिवसात बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात भेटी देणार असल्याचे सांगतही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

लक्ष्मण हाके म्हणाले, बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीविरोधी आहे. बारामतीकरांच्या मनात अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख आहे. मात्र, त्याचा वापर राजकारणासाठी होऊ नये. त्यांनी सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेत बिनविरोध संधी देण्याची मागणी करत सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करावा, असे आवाहन केले. राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत त्यांनी ओबीसी आरक्षण, पाणीटंचाई, शेतकरी व कामगारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप केला.

निवडणुकीची केली तयारी

आम्ही चळवळीतील कार्यकर्ते असून, जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढवणार आहोत, असे ते म्हणाले. पुढील काही दिवसांत फलटण येथे ओबीसींचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपकडूनही विरोध?

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मात्र, एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणावरून निर्माण झालेल्या वादाने या आवाहनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

हेदेखील वाचा : Baramati by-election : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Web Title: I will not allow baramati by election to go uncontested says laxman hake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Laxman hake
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.