Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Junnar Politics : जुन्नरमध्ये जिल्हा परिषद 8 जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 अर्ज दाखल

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद ८ गट व पंचायत समिती १६ गण अशा एकूण २४ जागांसाठी १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 22, 2026 | 12:08 PM
Junnar Politics : जुन्नरमध्ये जिल्हा परिषद 8 जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 अर्ज दाखल

Junnar Politics : जुन्नरमध्ये जिल्हा परिषद 8 जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 अर्ज दाखल

Follow Us
Close
Follow Us:

जुन्नर : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचा, नाराज उमेदवारांची नाराजी दूर करुन उमेदवारांची उमेदवारी माघारी घेण्यासाठी मोठा कस लागणार आहे.

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद ८ गट व पंचायत समिती १६ गण अशा एकूण २४ जागांसाठी १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

हेदेखील वाचा : Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आळे पिंपळवंडी गटातून सर्वाधिक १० तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उदापूर गणातून सर्वाधिक ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा परिषद गटाकरिता उमेदवारी अर्जांची संख्या

उदापूर- पूर- डिंगोरे ६, ओतूर धालेवाडी ६, आळे पिंपळवंडी १०, राजुरी-बेल्हे ४, बोरी बुद्रुक खोडद ५, नारायणगाव- वारूळवाडी ५, सावरगाव-कुसुर ८, बारव-तांबे ६.

पंचायत समिती गणाकरिता उमेदवारी अर्जांची संख्या

उदापूर ९, डिंगोरे ५, ओतुर ६, धालेवाडीतर्फे हवेली ४, पिंपळवंडी ७, आळे ५, राजुरी ६, बेल्हे ५, बोरी बुद्रुक ६, खोडद ३, नारायणगाव ५, वारूळवाडी ५, सावरगाव ७, कुसूर ६, बारव ४, तांबे ७.

जिल्हा परिषदेच्या निमित्ताने पक्षप्रवेश सुरु

पुणे महापालिका पाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या निमित्ताने पक्षप्रवेश सुरु झाले आहे. शिरुरच्या माजी आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परीषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात वरचष्मा असून, त्यांनी जिल्हा परीषदेचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. सोमवारी शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ भाजपनेही पक्ष प्रवेश करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने काही नाराजांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: In junnar 50 applications were filed for 8 zilla parishad seats and 90 applications were filed for 16 panchayat samiti constituencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Panchayat Samiti Election
  • political news

संबंधित बातम्या

Amit Shah in Rishikesh : गझनवी, खिलजी गप्प झाले पण आजही सनातनी ध्वज…; अमित शाहांचा आक्रमक पवित्रा
1

Amit Shah in Rishikesh : गझनवी, खिलजी गप्प झाले पण आजही सनातनी ध्वज…; अमित शाहांचा आक्रमक पवित्रा

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून 41 तर पंचायत समितीसाठी 72 उमेदवार
2

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून 41 तर पंचायत समितीसाठी 72 उमेदवार

मावळात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; 79 उमेदवारांचे अर्ज दाखल
3

मावळात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; 79 उमेदवारांचे अर्ज दाखल

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात
4

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.