Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News:सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ

बलगवडे गावात सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची तोड करण्याचा प्रस्ताव असून यामुळे पर्यावरण, पाणीसाठा आणि गावाच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2026 | 02:17 PM
Sangali ZP Election, Sangali Politics, Balgavade villager boycott the election

Sangali ZP Election, Sangali Politics, Balgavade villager boycott the election

Follow Us
Close
Follow Us:
  • बलगवडे गावाची सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका
  • गावकऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार
  • सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल पर्यावरण, पाणीसाठा आणि गावाच्या भवितव्यावर गंभीर परिणाम
Sangali  ZP Election 2026  : तासगाव तालुक्यातील बलगवडे गावाने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका घेत आज सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. ग्रामस्थांनी याबाबत आधीच इशारा दिला होता आणि आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही गावातील मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली.

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

बलगवडे गावात सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची तोड करण्याचा प्रस्ताव असून यामुळे पर्यावरण, पाणीसाठा आणि गावाच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील गायरान व परिसरात असलेली अंदाजे १२ ते १५ हजार झाडे ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी यापूर्वी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांनी या बैठकीवर बहिष्कार घालत आपला ठाम विरोध नोंदवला होता. प्रशासनाने योग्य भूमिका न घेतल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रशासन, माजी खासदार संजय पाटील व माजी आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन प्रकल्पाची जागा बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले होते.

महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले ‘हे’ मोठे आश्वासन; आता शहरवासियांना दररोज…

मात्र बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसांत कंपनीकडून पोलिस संरक्षणात पुन्हा वृक्षतोड सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमताने आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

आज निवडणुकीच्या दिवशी तहसीलदार अतुल पाटोळे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे व प्रशासनाच्या पथकाने बलगवडे गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र चर्चेअंतीही ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. “जोपर्यंत सौर प्रकल्पासाठीची वृक्षतोड पूर्णपणे थांबवली जात नाही आणि प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत लेखी निर्णय होत नाही, तोपर्यंत मतदानासह कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

दरम्यान, मतदान केंद्रावर केवळ मोजक्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली असून गावातील एकाही मतदाराने मतदान केले नसल्याचे चित्र होते. या बहिष्कारामुळे प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन पुढील भूमिका काय घेणार, ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: In sangli voters from balgavade village boycotted the elections for environmental reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती
1

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान
2

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’
3

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल
4

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.